कोरोना @ १३९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:01:13+5:30

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे.

Corona 139 | कोरोना @ १३९

कोरोना @ १३९

Next
ठळक मुद्देशहरालगतच्या क्षेत्रात शिरकाव : गुरूवारी नव्याने पाच संक्रमित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा गुरुवारी १३९ वर पोहोचला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. यात पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
अमरावती शहरापासून ११ किमी अंतरावर असलेल्या वलगाव येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तेथील ३९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह निघाली. जिल्ह्यातील ३९ व्या भागात कोरोनाने शिरकाव केल्याचे वलगाव येथे आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाने स्पष्ट झाले आहे. २१ मे रोजी सकाळी ११ वाजून ४१ मिनिटाला आलेल्या अहवालानुसार, लालखडी येथील २४ वर्षीय महिला, हनुमाननगर येथील ३८ वर्षीय महिला, हबीबनगर येथील ३२ वर्षीय पुरुष व अलहिलाल कॉलनी परिसरातील ५६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. या अहवालानुसार शहरात नव्याने अलहिलाल कॉलनी येथील क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले. याखेरीज वलगावचे क्षेत्र जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधित केले जाणार आहे.

शहरात चार नवे कंटेनमेंट झोन घोषित
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे. या चारही झोनमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना अनावश्यक बाहेर जाता येणार नाही, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले. आतापर्यंत महानगरात २५ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

मसानगंज हॉटस्पॉट सील
मसागंज परिसरात कोरोना संक्रमिताची संख्या वेगाने वाढत आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. परिणामी मसानगंज भागात येणारे चहुबाजुचे रस्ते, मार्ग सील करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्त ी अथवा त्यांच्या वाहनांना प्रवेश मनाई आहे. या भागात आतापर्यंत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Corona 139

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.