शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

१० अवैध सावकारांवर सहकार विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

सहकार विभागानुसार, एआर स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझादनगर येथील डॉ. फाजल अली अब्दुल समद अन्सारी यांच्या घरी धाड मारून १६ लाख ९० हजार २०० रुपये, कोरे स्टँप, इसारचिठ्ठी, बक्षीसपत्र, करारनामा, हक्क सोडल्याच्या पावत्या जप्त केल्या. अचलपूरचे एआर अच्युत उल्हे यांच्या पथकाने राजू अवधूतराव काळे (रा. वल्लभनगर) यांच्या घरून १,९५,९०० रुपये रोख, खरेदीखत, करारनामे, कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश आदी जप्त केले.

ठळक मुद्दे१९ लाखांची रोख, कागदपत्रे जप्त : ११ पथके, ८० अधिकाऱ्यांसह पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहकार विभागाच्या ११ पथकांनी शहरातील १० अवैध सावकारांच्या घरी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत धाडसत्र राबविले. १८ लाख ८८ हजार १०० रुपयांची रोख, कोरे धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली.तालुका उपनिबंधक कार्यालयात शहरातील अवैध सावकारांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात सहकार अधिकारी सुधीर मानकर व एआर राजेंद्र पाळेकर यांनी १३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ११ सहायक निबंधकांचे स्वतंत्र पथक गठित करून एकाचवेळी धाडसत्र राबविले.सहकार विभागानुसार, एआर स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझादनगर येथील डॉ. फाजल अली अब्दुल समद अन्सारी यांच्या घरी धाड मारून १६ लाख ९० हजार २०० रुपये, कोरे स्टँप, इसारचिठ्ठी, बक्षीसपत्र, करारनामा, हक्क सोडल्याच्या पावत्या जप्त केल्या. अचलपूरचे एआर अच्युत उल्हे यांच्या पथकाने राजू अवधूतराव काळे (रा. वल्लभनगर) यांच्या घरून १,९५,९०० रुपये रोख, खरेदीखत, करारनामे, कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश आदी जप्त केले. चांदूरबाजारचे एआर राजेंद्र भुयार यांच्या पथकाने राजेश्वर संतोष सरदार (वनश्री कॉलनी) यांच्या घरी टाकलेल्या धाडीत डायरी, खरेदीखत, इसार पावत्या, हक्क सोडण्याचे लेखे आढळले. वरूड एआर कल्पना धोपे यांना श्रीकांत दातीर (विकास कॉलनी) यांच्या घरी ११ कोेरे धनादेश सापडले. चांदूर रेल्वेचे एआर राजेंद्र मदारे यांनी शेखर ऊर्फ शशीकांत ठाकरे (अर्जुन एम्पायर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत कोरे धनादेश मिळाले. तिवसा एआर सचिन पतंगे यांनी निखिल विलास शेळके (राजहिलनगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत खरेदीखत, ६-२, फेरफार नकला, बक्षीसपत्र, इसारचिठ्ठ्या आढळून आल्या. अमरावतीचे एआर राजेंद्र पाळेकर यांनी अतुल नानाजी ठाकरे (सामरानगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत इसारचिठ्ठी, खरेदीखत, प्रतीज्ञापत्र, वाटणीपत्र सापडले. अमरावतीचेच एआर बी.एस. पाटील यांनी संतोष बाबूलाल साहू (छाया कॉलनी) यांच्या घरी मारलेल्या धाडीत खरेदीखत, डायरी, कच्च्या चिठ्या, चेक, विक्री पावती मिळाली तसेच नांदगाव खंडेश्वरच्या एआर प्रीती धामणे यांनी नारायण अजाबराव मोहोड (किरणनगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत डायरी, हिशेबाच्या चिठ्ठ्या, स्थावर मालमत्ता, खरेदीखत आदी सापडले. मोर्शी एआर सहदेव केदार यांचे पथक अमोल अवधूतराव काळे (न्यू छांगानी नगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत हात हलवत परत आले.जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रोकड ट्रेझरीमध्ये जमाधाडसत्रात मिळालेली रोडक गुरुवारी रात्री उशिरा येथील टेÑझरीमध्ये जमा करण्यात आली. सायंकाळी ६ नंतर ट्रेझरी बंद होत असल्याने यासाठी जिल्हाधिकाºयांची विशेष परवानगी घ्यावी लागली. कारवाईत जप्त सर्व कागदपत्रे, धनादेश यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये अन्य इसमाची कागदपत्रे असल्यास याविषयीची सुनावणी घेतली जाणार आहे. यामध्ये तथ्य आढळल्यास त्या अवैध सावकारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एआर राजेंद्र पाळेकर यांनी सांगितले.महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या आधारे १० अवैध सावकारांविरुद्ध धाडसत्र राबविण्यात आले. नागरिकांनी अवैध सावकारांविरुद्ध न घाबरता सहकार विभागाकडे तक्रारी दाखल कराव्यात.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Policeपोलिस