शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाशी वाद, हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:01 IST

पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले. राजापेठ हद्दीतील चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली.

ठळक मुद्देघरात पाणी शिरल्याचे कारण : दोन्ही गटांतील सहा जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले. राजापेठ हद्दीतील चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली. यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.पोलीस सूत्रानुसार, प्रणित सोनी, त्यांचे भाऊ दर्शन सोनी, शशांक जोशी, कुणाल सोनी (सर्व रा. बालाजी प्लॉट) आणि बुंदेले कुटुंबातील अक्षय (२५), त्याचे वडील गोपीचंद (५५) व आई रेखा (५० तीन्ही रा. चुनाभट्टी) अशी जखमींची नावे आहेत.दरवर्षी पावसाळ्यात अंबा नाला ओव्हरफ्लो होऊन नाल्याकाठी राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत नागरिक नगरसेवकांची दारे ठोठावतात. चुनाभट्टी परिसरालगत अंबा नाला असून, तेथील बुंदेले कुटुंबीयांनी नाल्यातील पाणी घरात शिरत असल्याबद्दल नगरसेवक प्रणित सोनींकडे समस्या मांडली होती. सोमवारी दुपारी प्रणित सोनी, त्यांचे भाऊ दर्शन, शशांक व कुणाल असे चौघे चुनाभट्टी परिसरात उपस्थित असताना, अक्षय बुंदेलेने घरात पाणी शिरत असल्याबाबत सांगितले आणि उपाययोजना केव्हा कराल, याबाबत विचारणा केली. शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच बुंदेले कुटुंबीय व प्रणित सोनी यांच्या हाणामारी सुरू झाली. लाथाबुक्क्या, लाठी व दगडांनी एकमेकांवर हल्ला केला. प्रणित सोनीसह दर्शन, शशांक, कुणाल तसेच अक्षय बुंदेले, गोपीचंद बुंदेले व रेखा बुंदेले जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांतील जखमींना तात्काळ पोलीस ठाण्यात नेले तसेच इर्विन रुग्णालयात उपचारासाठी आणले. सायंकाळनंतर राजापेठ पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या.अक्षय बुंदेले याच्या तक्रारीवरून नगरसेवकासह चार जणांविरुद्ध भादंविचे कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक प्रणित सोनीेच्या तक्रारीवरून बुंदेले कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दर्शन सोनी, शशांक जोशी, अक्षय बुंदेले व कुणाल सोनी यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी