शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका

By प्रदीप भाकरे | Updated: July 28, 2023 17:06 IST

ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून काढला होता दर्यापूरकडे पळ

अमरावती : पोलिसांना न जुमानता व रस्त्यात आडव्या करून ठेवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून मुर्तिजापूरहून पळालेला गोवंशाचा कंटेनर दर्यापूर पोलिसांनी पकडला. २८ जुलै रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. त्या कंटेनरसह त्यातील ३५ जनावरांची सुटका करण्यात आली. दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली.

२८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास कारंजा मार्गे मूर्तिजापूरकडे कंटेनरने अवैधरित्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मुर्तिजापुर पोलिसांनी मिळाली. तो गोवंश असलेला कंटेनर थांबवण्याकरिता पोलिसांनी पाठलाग सुरू केला होता. कंटेनरला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केल्यावरही कंटेनरच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवत नेले, मुर्तिजापुर पोलिसांनी मार्गामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आडवे करून कंटेनर अडविण्याचा प्रयत्न केला असता कंटेनरचालकाने ट्रॅक्टर ट्रॉली उडवून दर्यापूरकडे पळ काढला होता. मूर्तिजापूर पोलिसांकडून ती माहिती दर्यापूर पोलिसांना देण्यात आली. 

दर्यापूर पोलिसांची नाकाबंदी

माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावर त्वरित नाकाबंदी केली. तथा मुर्तिजापूर टी-पॉईंटवर कंटेनर थांबविला. त्या कंटेनरमध्ये एकूण ३५ गोवंश मिळून आले. तथा दोन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपी व मुद्देमाल मूर्तिजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारAmravatiअमरावती