लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अनेक यंत्रणांकडून विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांचेही योगदान मिळत आहे. येथील हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या संकटकाळात स्थानिक तंत्रज्ञ, संशोधक, तज्ज्ञांकडून स्थानिक पातळीवर विविध साधने, यंत्रणा निर्माण होण्यासाठी योगदान मिळत आहे, हे निश्चित आश्वासक आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सॅनिटायझेशन करण्यास हे चेंबर उपयुक्त आहे. सहा फूट, तसेच चार फूट आकारात असे चेंबर बनविण्यात येत असून, त्याचा विविध ठिकाणी वापर करता येईल, असे सलीम भाई यांनी सांगितले.
अमरावतीत स्थानिक व्यावसायिकाकडून सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 19:34 IST
हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे.
अमरावतीत स्थानिक व्यावसायिकाकडून सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती
ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून कौतुककोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपयुक्त