( तिनही बातम्या एकत्र)
आक्रमक आंदोलन : केंद्र सरकारविरुद्ध नारेबाजी, निदर्शने
नांदगाव/दर्यापूर/तिवसा : दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व केंद्राने केलेल्या शेतीसंबंधी कायद्यांना विरोध म्हणून काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.
गुरुवारी नांदगाव खंडेश्वर येथे बसस्थानकावर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक सवाई, माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, गौतम सोनोने, सुनील शिरभाते, सचिन रिठे, मोरेश्वर दिवटे, सरफराज खान, बांधकाम सभापती गजानन मारोटकर, निशांत जाधव, विनोद जगताप, गजानन भडके, योगेश चव्हाळे, मोहम्मद इद्रीस, राजेश जाधव, प्रवीण सुने, प्रवीण लळे, शेख हरून, चंदू देशमुख, सुरेश रावेकर, संजय कुंभलकर, रशिद कुरेशी, रमेश ठाकरे, सतीश पोफळे, सुहास मोरे, अब्दुल जुनेद, प्रकाश उटबगले, चंदू गावंडे, शामराव पवार, अजय लाड, मनोज मारोटकर, सुनील बिटले व तालुक्यातील कॉंग्रेसची मंडळी उपस्थित होती.
बॉक्स
तिवसा येथे बैलबंडीतून आंदोलन
तिवसा येथे काँग्रेस पक्षाने तहसील कार्यालयावर आंदोलन सुरू केले आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैलबंडीवर बसून केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकूंद देशमुख, संजय देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, पूजा आमले, शिल्पा हांडे, शरद वानखडे, प्रफुल्ल देशमुख, मुकुंद पुनसे, प्रदीप बोके, संदीप आमले, योगेश वानखडे, रितेश पांडव, लुकेश केने, वैभव बोके, सागर राऊत, किसन मुंदाने, संजय चौधरी, राजेश चौधरी, अस्लम मंसूरी, आनंद शर्मा, दिलीप वानखडे, गौरव ढोरे, देविदास गायकवाड, वैभव काकडे, अंकूश देशमुख, प्रशिक शापामोहन, पांडुरंग खेडकर, रवी हांडे, अब्दुल सत्तार, नीलेश खुळे, रुपाली काळे, पंकज देशमुख, राजेश राऊत, उमेश राऊत, स्वप्निल गंधे, अनिकेत प्रधान, यज्ञेष तिजारे, आशिष ताथोडे, मोहित मोटघरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापुरात शेतकरी कृषी कायदा अधिनियम रद्द करण्याची मागणी
दर्यापूर : गुरुवारी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुनील गावंडे, दिवाकर देशमुख, अभिजित देवके, बाळासाहेब टोळे, राजेंद्र नागपुरे, नितेश वानखडे, शिवाजी देशमुख, दत्ता कुंभारकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.