शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

काँग्रेस, शरद पवार गटाचे खातेही उघडले नाही; दिग्गज नेते झाले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 11:48 IST

Amravati Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results : अनपेक्षित निकालाने महाविकास आघाडीला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना आश्र्चयाचा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यात आठपैकी सात जागा महायुतीच्या वाट्याला, तर एक जागा उद्धवसेनेच्या वाट्याला गेली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही, हे विशेष.

गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे तीन, दोन अपक्ष, दोन प्रहार तर एक भाजपचे आमदार निवडून आले होते. मात्र यंदा अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजना, मतांच्या ध्रुवीकरणाला ब्रेक, एकसंघ महायुती आणि नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांवर मात करून महायुतीचे नेते मतदारांच्या सामोरे जाताना दिसून आले. त्यामुळे अमरावतीत सुलभा खोडके, बडनेरात रवी राणा, धामणगाव रेल्वे प्रताप अडसड, मोर्शी चंदू यावलकर, अचलपूर प्रवीण तायडे, मेळघाट केवलराम काळे, अचलपूर राजेश वानखडे हे महायुती आणि दर्यापुरातून गजानन लवटे हे महाविकास आघाडीतून विजयी झाले. यावेळी काँग्रेसने तिवसा, अचलपूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट व अमरावती या पाच जागांवर निवडणूक लढविली. परंतु, एकही जागा जिंकता आली नाही.

महाविकास आघाडीतून शरद पवार गटाने मोर्शीची जागा लढविली असली तरी गिरीश कराळे यांना मते फार कमी मिळाले. उद्धवसेनेने बडनेरा आणि दर्यापूर या दोन जागा लढवित दर्यापुरातून गजानन लवटे हे एकमात्र महाविकास आघाडीतून विजयी झाले आहेत. 

दिग्गज नेते झाले पराभूत अमरावती जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनादेखील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. बच्चू कडू यांना भाजपने अचलपूर मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी दिलेल्या नवख्या प्रवीण तायडे यांनी पराभव केला. या हेविवेट पराभवामुळे अनेकांना अक्षरशः धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत यशोमती ठाकूर, बच्चू कडू हे माघारीवरच राहिले. महायुतीच्या लाटेत दिग्गज उमेदवारांना गारद व्हावे, असाच काहीसा निकाल विधानसभा निवडणुकीत लागला आहे.

बसपा, वंचित, मनसे उमेदवारांनाही नाकारलेअमरावती मतदारसंघातून मनसेचे मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी २५४५, तर बसपाच्या मेघा तायडे यांना ११६७ 9 मते मिळाली. बडनेरा मतदारसंघातून बसपाचे रमेश नागदिवे यांना ३५०२ मते मिळविली. मेळघाटातून बसपाचे मोतीलाल ठाकरे यांना १५९३ मते, तिवस्यातून बसपाचे डॉ. मुकुंद डोणे यांना १०७३ मते घेतली. तथापि, दर्यापुरातून वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाकपांजर यांनी २१ हजार २६३ मते घेतली. अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीचे राहुल मेश्राम यांनी ३०४८ मते घेतली. धामणगाव रेल्वे मतदार संघातून वंचितचे नीलेश विश्वकर्मा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. एकंदर विधानसभा निवडणुकीत बसपा, वंचित, मनसे उमेदवारांनाही नाकारल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Amravatiअमरावतीachalpur-acअचलपूरYashomati Thakurयशोमती ठाकूरBachhu Kaduबच्चू कडू