यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक जागांवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्याचा दावा जिल्हा काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात ४४ पैकी २०, भातकुली ३५ पैकी २१, नांदगाव खंडेश्वर ४७ पैकी ३०, दर्यापूर ५० पैकी ३५, अंजनगाव सुर्जी ३४ पैकी २५ , तिवसा २८ पैकी २३, चांदूररेल्वे २९ पैकी १७ , धामणगाव रेल्वे ५३ पैकी ३१, अचलपूर ४४ पैकी २७, चांदूरबाजार ४१ पैकी २८, मोर्शी ४० पैकी २५, वरुड ४१ पैकी ३०, धारणी ३४ पैकी १४, चिखलदरा २३ पैकी १५ अशा ३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व मिळविल्याचे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.
५५३ पैकी ३४१ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST