शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांंच्या फोटोला जोडे मारले, धोतराची केली होळी; अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 15:06 IST

राज्यपाल कोश्यारी व भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध

मनीष तसरे 

अमरावती : शहर जिल्हा युवक काँग्रेसअमरावती जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते, सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध धोतर फाडून व फोटोला जोडे मारून आज राजकमल चौक येथे आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांनी एका समारंभात भाषण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने झाले अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जनतेमध्ये निर्माण झालेला प्रचंड असंतोष सोमवारी या निदर्शने व निषेध कार्यक्रमाच्या वतीने दिसून आला.

राजकमल चौक येथे सकाळी ११ वाजता माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर तथा प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, प्रदेश चिटणीस आसिफ तव्वक्कल, युवक काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष नीलेश गुहे, युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंकज मोरे,अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष शक्ती राठोड, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ.अंजली ठाकरे, यांच्या उपस्थितीत यानिषेध मोर्चाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत धोतर फाडून व फोटोला जोडे मारून आक्रोश व्यक्त केला.

कोश्यारी हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. ते सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेची  आणि महापुरुषांची अवहेलना करीत आहेत आणि असताना देखील भाजपकडून त्यांच्या विरोधात निषेधाचा एक शब्दसुद्धा येत नाही. किंबहूना यांची पाठराखण केल्या जाते, असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला. यासह सत्ताधारी शिंदे गटाकडून सुद्धा याबाबतीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न होणे आणि त्यांच्या राजीनाम्याची व बारखास्ताची मागणी न करणे हे त्यांचे छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिंदेगटाला सुद्धा अतिशय लज्जास्पद असल्याची टीका आंदोलनकरर्त्यांनी केली. या निषेध कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यपाल कोश्यारी यांना बरखास्त करा, तसेच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAmravatiअमरावती