शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याचे जमीन हस्तांतरण पूर्ण

By admin | Updated: May 24, 2014 23:12 IST

बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी लागणार्‍या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. येत्या जुलै महिन्यात या कारखान्याचे भूमिपूजन होण्याचे संकेत आहेत.

अमरावती : बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी लागणार्‍या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. येत्या जुलै महिन्यात या कारखान्याचे भूमिपूजन होण्याचे संकेत आहेत.

बडनेर्‍यातील पाच बंगला परिसरातील निर्माणाधिन रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याची जबाबदारी पटना येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाकडे सोपविली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या महत्प्रयासाने मंजूर झालेला हा कारखाना २४७ कोटी रूपये खर्च करून पूर्णत्वास येणार आहे. १९६ एकर जमिनीवर हा कारखाना निर्माण होणार असून जमिन हस्तांतरणासाठी १५ कोटी ३२ लाख रूपये खर्च झाले आहेत. यासाठी ६४ शेतकर्‍यांची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. कारखान्यासाठी २३ घरे तर १0९ एवढी लोकसंख्या बाधित झाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीमध्ये मौजा टाकळी (खुर्द) येथील ७२.१७ हेक्टर, मौजा बडनेरा २.९६ हेक्टर तर मौजा दुर्गापूर २.७२ हेक्टर इतक्या जमिनीचा समावेश आहे. या कारखान्यासाठी जमीन देण्यास प्रारंभी शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला. अखेर प्रशासनाने सामोपचाराने तोडगा काढून रेल्वेला जमीन हस्तातंरणाची प्रक्रिया पूर्ण करून दिली. त्यामुळे रेल्वे वॅगन कारखाना पूर्णत्वास जाईल.