शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थिनीची तक्रार; अमरावती विद्यापीठात विभागप्रमुखाचा कारभार काढला

By गणेश वासनिक | Updated: April 1, 2023 14:52 IST

विद्यापीठात विद्यार्थिनीचे मानसिक, आर्थिक शोषण प्रकरण; सात दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचे मानसिक, आर्थिक शोषण केल्याप्रकरणी एका विभागप्रमुखांकडून त्यांचा कारभार काढण्यात आला आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. सात दिवसात संबंधित विभागप्रमुखांना खुलासा मागण्यात आला असून, त्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात येणार आहे.

संशोधन कार्य करणाऱ्या एका विद्यार्थिनीचे ‘त्या’ विभागप्रमुखांकडून मानसिक, आर्थिक शोषण करण्यात आल्याची तक्रारप्रशासनाकडे करण्यात आली आहे. ही तक्रार निनावी असली तरी कुलसचिवांकडे या प्रकरणाची जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, १ सप्टेंबर २०२० रोजी पीएच.डी. साठी नोंदणी केली होती. प्रयोगशाळेत तिचे संशोधन कार्य सुरू होते. ‘ऑप्टीकल बायोंसेंसर’ हा तिचा विषय आहे. मात्र या विभागात ‘भौतिक’ सोयीसुविधांची रेलचेल असताना सुद्धा संबंधित विभागप्रमुखांनी मानसिक त्रास दिला. शैक्षणिक कारण नसताना सुद्धा बाहेर ठिकाणी फिरायला येण्यासाठी त्याने अनेकदा तिच्यावर दबाव आणला.

प्रयोगशाळेत उपयोगातील वस्तू, साहित्य विकत आणण्यासाठी त्रास देण्यात आला, असे नमूद आहे. अप्रत्यक्षरीता विभाग प्रमुखांनी पैशाची मागणी देखील केली. दरम्यान २२ ऑक्टोबर २०२२ रोजी कुणीतरी या विभागप्रुखांची निनावी तक्रारी केली. या तक्रारीशी काहीही संबध नसताना सदर विद्यार्थिनींवर शंका घेऊन त्याने मानसिक छळ सुरू केला. संशोधनावर नकारात्मक शेरा लिहू, अशी धमकी त्याने दिली. तुझी पीएच.डी. होऊ देणार नाही. प्रयोगशाळेत काम करू देणार नाही, असे मार्गदर्शक आणि विभागप्रमुखांनी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर चार महिन्यांपासृून प्रयोगशाळेत संशोधन कार्य करण्यास बंदी घालण्यात आली. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने वरिष्ठांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय प्रदान करावा, अशी मागणी या विद्यार्थिनीने कुलगुरुंसह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, अमरावती विभागाचे सह संचालकांकडे तक्रार दिली आहे.विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या अनुषंगाने कुलगुरूंच्या आदेशानुसार ‘त्या’ विभागप्रमुखांचा कारभार काढण्यात आला आहे. संबंधितांचा खुलासा आल्यानंतर चौकशी सुरू केली जाणार आहे. त्याकरिता समिती गठीत करण्यात येईल. - डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावती