लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मोर्शी-वरूड तालुक्यांत ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समित्यांची स्थापना उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडून २४ मार्च २०२० रोजी प्राप्त निर्देशान्वये करण्यात आली आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, खबरदारी व उपाययोजनांचा भाग म्हणून मोर्शी, वरूड तालुक्यांमध्ये गावपातळीवर वरिष्ठांच्या आदेशान्वये ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीची स्थापना करण्याबाबत उपविभागीय अधिकारी हिंगोले यांनी २४ मार्च रोजी आदेश काढले आहेत.गावपातळीवरील या समितीमध्ये सरपंच अध्यक्ष राहतील. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक/सेविका, कोतवाल , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे सदस्य असतील. पोलीस पाटील हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. नियुक्त समितीतील अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव यांनी ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील लग्न, आठवडी बाजार, विदेशातून किंवा बाहेरगावावरून आलेली व्यक्ती, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे तसेच संशयित व्यक्ती आजारी आढळल्यास अशा सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करण्याकरिता गाव समिती स्थापन केली आहे. सदर विषाणूशी निगडीत शासकीय स्तरावरील माहिती वेळोवेळी पुरवली जाईल. आदेशाचे व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे काम पोलीस पाटलांनी करावे, असे निवासी नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी सदर आदेशात कळविले आहे.
महसूल विभागामार्फत गावपातळीवर समित्या गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, खबरदारी व उपाययोजनांचा भाग म्हणून मोर्शी, वरूड तालुक्यांमध्ये गावपातळीवर वरिष्ठांच्या आदेशान्वये ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीची स्थापना करण्याबाबत उपविभागीय अधिकारी हिंगोले यांनी २४ मार्च रोजी आदेश काढले आहेत.
महसूल विभागामार्फत गावपातळीवर समित्या गठित
ठळक मुद्देतहसीलदारांकडे जबाबदारी : उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश