स्थायी समितीत नाराजी : ‘शब्द’ पाळण्यासाठी दबावअमरावती : अमरावती महानगरासाठी केंद्र शासनाने मंजूर केलल्या ६४ स्टार बसेस ‘कमिशन’ चक्रात अडकल्याची माहिती हाती आली आहे. स्टार बसेस खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही प्रक्रिया मंदावल्याने सदस्य कमालीचे हैराण आहेत. यापूर्वी दिलेला ‘शब्द’ कोण पाळणार? यावरुन संयशकल्लोळ सुरु आहे.जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय अभियानांतर्गत केंद्र शासनाने अमरावती महानगरासाठी ६४ स्टार बसेस मंजूर केल्या होत्या. महापालिकेने स्टार बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया राबवून टाटा मोटर्स कंपनीला या बसेस खरदीचा कंत्राटही सोपविला. ६४ स्टार बसेस, आगार, बसस्थानक आदी सोईसुविधांकरिता २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कालांतराने यात काही सुधारणा करुन ६४ बसेस खरेदीसह आगार बांधकाम, तांत्रिक सुविधेसाठी १५ कोटी ६८ लाख रुपये नव्याने मंजूर करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने या स्टार बसेस खरेदीकरिता काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविली होती.
‘कमिशन’ चक्रात अडकली स्टार बस !
By admin | Updated: December 7, 2014 22:41 IST