शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

थेट ठाण्यात येऊन अल्पवयीन मुलीनेच रोखला स्वत:चा बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

सदर मुलगी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.  मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख आहे. पैशांसाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, ही रक्कम नेमकी किती आणि हा सौदा कसा निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब मुलीला कळल्यानंतर, सध्या मी लग्न करणार नाही, मला शिक्षण घ्यायचे आहे, अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे आईने मुलीला मारहाणसुद्धा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

ठळक मुद्देआई, युवकाविरुद्ध गुन्हा, २० वर्षीय युवकाशी विवाह निश्चित करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आईनेच काही रकमेच्या आमिषातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २० वर्षीय युवकाशी बालविवाह पक्का करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बालविवाहाला मुलीनेच विरोध करीत थेट गाडगेनगर ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. मुलीच्या तक्रारीवरून मुलीची आई व युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. पोलीस सूत्रांनुसार, २० वर्षीय युवक (रा. रहाटगाव), ३८ वर्षीय महिला (रा. राजपूत ढाब्याच्या मागील झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. १५ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम १०,११ बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंदविला. सदर मुलगी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.  मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख आहे. पैशांसाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, ही रक्कम नेमकी किती आणि हा सौदा कसा निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब मुलीला कळल्यानंतर, सध्या मी लग्न करणार नाही, मला शिक्षण घ्यायचे आहे, अशी भूमिका तिने घेतली. त्यामुळे आईने मुलीला मारहाणसुद्धा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, मुलीचा विरोध कायम होता. मुलीने न डगमगता शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना घडलेला प्रकार सांगितला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत, तिच्या तक्रारीवरून त्यांनी आई व युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तसेच आईला तातडीने अटक केली. स्वत:च्या बालविवाहाला विरोध करणाऱ्या मुलीला मारहाण करण्यात आली का,  याबाबत तिला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले. नियमानुसार तिची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात आली.  

मुलीला पाठविले बाल निरीक्षणगृहात फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आईला केले न्यायालयासमोर हजर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मुलीच्या आईला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर केले. तिला वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्यात आले.  पोलीस तरुणालासुद्धा अटक करणार आहेत. 

मुलगी अल्पवयीन आहे. तिने स्वत: ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली. त्यावरून आई व युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुलीच्या आईला अटक केली आहे. - आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस