शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा

By admin | Updated: August 19, 2015 00:45 IST

श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारीकेपासून तर सुवासीनींच्या आवडीचा, तसेच ...

अमरावती : श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारीकेपासून तर सुवासीनींच्या आवडीचा, तसेच नवविवाहितेपासून तर माहेरवासीयांच्या मनात कायम पिंगा घालणारा हा महिना उत्साह आणि पावित्र्याचा सुरेख मेळ घडवून आणणारा आहे. मंगळागौर, गौरी गणपती, श्रावण सोमवार, नागपंचमी आदी सणांची तयारी घराघरात मांगल्य घेऊन येते. अशातच या उत्साहाला उधाण आणण्यासाठी खास श्रावण सोहळ्याचे आयोजन दि. २१.८.२०१५ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती, वेळ ११ ते ४ सखी मंच सदस्यांसाठी करण्यात आले आहे. कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत श्रावण सोहळा सोबत कॉमेडीचा मेळा असा हा कार्यक्रम सहप्रस्तुतकर्ता मेडिमिक्स असून इन्शुरन्स पार्टनर म्हणून बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स यांचे सौजन्य लाभले आहे.अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उद्देश असलेल्या या कार्यक्रमात तशाच वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात सखींसाठी उखाणे स्पर्धा (यात विनोदी उखाणा घ्यावयाचा आहे), ईन्होवेटीव्ह मेडिमिक्स हर्बल फॅशन शो (फक्त हर्बल साधनांचा वापर करून वेशभूषा करावी. जसे पाने, फुले, फळे, वनस्पती), राखी थाळी सजावट (यात राखी थाळी घरून तयार व सजवून आणायची), मेहंदी स्पर्धा (कोन आणि मॉडल सोबत आणायचे). रांगोळी स्पर्धा, वन मिनिट गेम शो अशा स्पर्धा आणि उपस्थितांसाठी खास मंगळागौर खेळांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. कलर्स चॅनलवर येत्या ५ सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी रात्री १० वाजता प्रसारीत होणारा धमाल कॉमेडी शो म्हणजे ‘‘कॉमेडी नाईटस् बचाओ’’ या तुफान विनोदी कार्यक्रमाला साजेसा हा श्रावण सोहळासुद्धा तसाच परंपरेला अनुसरून गंमतजंमत आणि खेळीमेळीच्या वातावरणात, हास्य रंगात साजरा करायचा आहे. यातील बेस्ट विनोदि उखाणा सादरकरणाऱ्या सखींना गिफ्टस् दिले जातील.कलर्स चॅनेलवर प्रसारीत होणाऱ्या या ‘‘कॉमेडी नाईटस् बचाओ’’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कॉमेडीयनच्या ५ जोड्या म्हणजे १० कलाकार मिळून समोर बसलेल्या प्रेक्षकांना आपल्या भन्नाट, कल्पकतेच्या जोरावर विनोदाच्या कळसावर नेऊन ठेवणार आहेत ज्यात एकमेकांच्या काही मनोरंजक, व्यक्तिगत, व्यावसायिक क्षेत्राबद्दल कॉमेडी पंचेस आणि तुफान विनोदी गरमागरम चुटकुले त्यांच्यावर त्यांच्यासमक्ष सादर करणार आहे. एकूणच काय तर या १० कॉमेडीयनच्या कलेतून साकारणारी कॉमेडी प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन जाणार आहे. आसू आणि हसू यांचे मिश्रण या शो ला बघणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात दिसणार आहे. मेडिमिक्स इनोव्हेटिव्ह हर्बल फॅशन शो मध्ये विजेत्या सखींना प्रथम बक्षीस- मेडिमिक्स क्वीन २०१५ या पुरस्काराने तर द्वितीय विजेतीला- मेडिमिक्स फ्रेश फेस २०१५ तर तृतीय विजेतीला मेडिमिक्स हेल्दी स्कीन २०१५ असा बहुमान मिळणार आहे. इन्शुरन्स पार्टनर म्हणून ज्यांनी या सोहळ्याला योगदान दिले आहे त्या बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स यांचे तर्फे ‘‘महिलांचे आर्थिक सशक्तीकरण’’ या विषयावर विशेष मार्गदर्शन आणि सादरीकरण करण्यात येईल. सर्व स्पर्धांची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीकरिता संपर्क ९८५०३०४०८७, ८९५६५४४४४८ यांच्याशी साधावा. (प्रतिनिधी)