शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कंत्राटदारांच्या ‘मोनोपली’ला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:28 IST

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला .

ठळक मुद्देअडीच लाखांचा दंड : आयुक्तांची ‘स्पॉट व्हिजिट’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला .गतवर्षी एकल कंत्राटाचे वारे वाहू लागल्यानंतर स्वच्छता कंत्राटदारांच्या मनमानीत वाढ झाली. आम्ही मुदतवाढीवर काम करीत आहोत. करारनामा तर केव्हाच संपुष्टात आला आहे. वाढीव मोबदला देत असाल, तरच काम करू, अशी विविध क्लृप्त्या लढवून मागील वर्षभरात स्वच्छतेचा बोजवारा उडविला जात आहे. स्वास्थ्य निरीक्षक व बीट प्यूनवर कंत्राटदारांच्या कामगारांची दैनंदिन हजेरी तपासून देयके प्रस्तावित करणे अभिप्रेत असताना, प्रत्यक्ष काम करणाऱ्या या यंत्रणेत भ्रष्टाचार शिरल्याने स्वच्छता कागदावर होऊ लागली. मात्र स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरिक्षकांकडून वरिष्ठांना ‘आॅलवेल’चा अभिप्राय येत असल्याने कंत्राटदारांचे फावले. आम्ही महापालिकेवर उपकार करित आहोत, या अविर्भावातून काही स्वच्छता कंत्राटदार काम करित असल्याने व दंड केल्यास काम सोडण्याची भाषा करीत असल्याने प्रशासनाचा नाई$$$$$लाज झाला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त हेमंत पवार यांनी गुरुवारी फ्रेजरपुऱ्यातील नाल्यांची पाहणी केली. दैनंदिन स्वच्छतेत येणाऱ्या छोट्या नाल्यांची दुरवस्था त्यांनी अनुभवली व के.के. कंस्ट्रक्शन स्वच्छता कंत्राटदाराला ५० हजाराचा दंड ठोठावला. शुक्रवारी आयुक्तांनी उपायुक्त नरेंद्र वानखडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यासह साईनगर व बडनेऱ्यातील स्वच्छतेविषयक पाहणी केली. दुपारी त्यांनी अंबा नाल्याची पाहणी केली.चार कंत्राटदारांना दोन लाखांचा दंडअंबापेठमधील जानकी स्वयंरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था व क्षितिज बेरोजगार, प्रभाग क्रमांक २१ जुनी वस्तीमधील बहिरमबाबा नागरी सेवा संस्था व प्रभाग क्रमांक २२ मधील सायमा सुशिक्षित बेरोजगार संस्था या चार स्वच्छता कंत्राटदारांना शुक्रवारी प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला. स्वास्थ्य निरिक्षक ए.ए. शेख व जयकुमार उसरे यांची एक महिन्याची वेतन कपात करण्यात आली. आयुक्तांसह उपायुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आकस्मिक पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.