शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रहाटगावातील कॉलनी परिसरात फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:05 IST

महापालिका हद्दीतील रहाटगावातील कॉलनी परिसरात तीन दिवसांच्या पावसाने नागरिकांची फसगत केली आहे. येथे रस्तेही केलेले नसल्याने चारचाकीच नव्हे, दुचाकीदेखील ओल्या मातीत रुतत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन काढण्यासाठी क्रेनचा वापरदेखील करावा लागला.

ठळक मुद्देवाहने काढण्यासाठी क्रेनचा वापर : विकास कर भरूनही सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीतील रहाटगावातील कॉलनी परिसरात तीन दिवसांच्या पावसाने नागरिकांची फसगत केली आहे. येथे रस्तेही केलेले नसल्याने चारचाकीच नव्हे, दुचाकीदेखील ओल्या मातीत रुतत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन काढण्यासाठी क्रेनचा वापरदेखील करावा लागला.रहाटगावमधील वैष्णवी विहार, पांडे ले-आऊट हा संपूर्ण कॉलनी परिसर असूनही येथे अजूनही रस्ते, नाली यांसारख्या प्राथमिक सुविधा महापालिकेकडून पुरविले गेलेले नाहीत. मुक्तांगण शाळेमागील सागवान परिसरामध्ये जवळपास २०० ते ३०० घरांची वस्ती आहे. या भागात घर बांधतेवेळी महापालिकेकडून ६० से ७० हजार रुपये विकास कर म्हणून आकारला जातो. मात्र, आठ से दहा वर्षांपासून या भागात ना साधे रस्ते, ना नाल्या महापालिका करू शकली. आमदार या भागात कधी फिरकलेच नाहीत. नगरसेवकांचेही त्याकडे लक्ष दिले आहे.अलीकडच्या पावसात खड्डे नाल्याच्या पाण्याने भरलेल्याने मातीच्या रस्त्यांवरील ओली काळी माती निसरडी झाली आहे. त्यामुळे वाहन घसरून आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. मुलांना शाळेत जाताना तसेच वृद्धांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांनी आतापर्यंत तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे, महापालिका आयुक्त, नगरसेवकांना वारंवार निवेदने दिली. पण, कोणीही दखल घेतलेली नाही. या भागात लवकरात लवकर नाली व रस्त्याची प्राथमिक सुविधा उपलब्ध केली नाही, तर महापालिकेचा कोणताही कर कोणीही भरणार नाही तसेच लोकप्रतिनिधींना बंदी घालून मतदानावरही बहिष्कार टाकू, अशा संतप्त भावना येथील नागरिक वसंत ठाकरे, रवींद्र राऊत, सुनील देशमुख, योगेश खेडकर, सचिन पडोळे, साहेबराव गोहत्रे आदींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Rainपाऊस