शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी कचरा डेपोची कलेक्टरकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:47 IST

सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन्याच्या आत द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देघनकचऱ्याचे उल्लंघन : राष्ट्रीय हरित लवादाला देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन्याच्या आत द्यावे लागणार आहे.महापालिका आयुक्त संजय निपाणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय व्यवस्थापक संजय पाटील त्यांच्या सोबत होते. सुकळी कचरा डेपोत घनकचरा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व महापालिकेचे आयुक्त यांना गुरुवारी नोटीस बजावली, तसेच जिल्हाधिकारी व एमपीसीबीने संयुक्त पाहणी करून महिनाभरात अहवाल मागितला आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश अनासने यांनी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हरित लवादाकडे याप्रकरणी याचिका दाखल केली. हरित लवादाने जारी केलेल्या नोटीसीत सुकळी कचरा डेपोत घनकचरा नियमांचे उल्लंघन केल्याचा उल्लेख आहे. याशिवाय कचºयाचे वर्गीकरण, कचºयाची गळती, घातक घनकचरा व याचे मानवी जीवनावर होणाºया अनिष्ठ परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यावेळी या तीनही प्रतिवादींना हरित लवादाने उपस्थित राहण्यास सांगितले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रियेचीमाहिती आयुक्तांद्वाराजिल्हाधिकारी, ‘एमपीसीबी’चे विभागीय व्यवस्थापक यांच्या संयुक्त दौºयात सुकळी स्थित घनकचरा प्रकल्पाची वस्तुस्थितीची माहिती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिली. याशिवाय प्रस्तावित घनकचरा प्रक्रियेची माहिती यावेळी देण्यात आली. सुकळी बायोमायनिंग प्रकल्पाची निनिदा प्रक्रिया झालेली आहे. लवकरच या ठिकाणी काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.‘एमपीसीबी’चे दुर्लक्ष, कारवाई केव्हा?सुकळी येथील कचरा डेपोमध्ये सातत्याने होत असलेले प्रदूषण, घनकचºयाचे उल्लंघन, तेथे लागलेल्या आगीमुळे मानवी जीवनावर होत असलेले अनिष्ठ परिणाम, या ठिकाणी उघड्यावर टाकली गेलेली मृत जनावरे, प्रतिबंधित गुटख्याची याच ठिकाणी लावण्यात येत असलेली विल्हेवाट अशा अनेक प्रकरणांत पर्यावरणप्रेमींकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्यात. यावर नोटीस बजावण्याव्यतिरिक्त कुठलीही कारवाई, या अधिकाºयांनी केलेली नाही. त्यामुळेच हा प्रकार वाढीस लागला आहे. यात एमपीसीबीलादेखील दोषी मानून त्यांच्यावर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास