शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांमध्ये ८० ग्रामपंचायतींत सव्वा तीनशे कोटींची सामूहिक लूट, ‘कॅग’चे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:31 IST

सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांचा कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींची सामूहिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 - गणेश वासनिक अमरावती - सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांचा कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींची सामूहिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मंत्रालय ते ग्रामपंचायत स्तरावर ही लूट झाली आहे. यातील दोषी अद्यापही कारवाईपासून दूर आहेत.            राज्यात दलितवस्ती सुधार योजनेत झालेल्या विकासकामांचे नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने औरंगाबाद, अकोला, बीड, चंद्रपूर, लातूर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे आठ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मार्च २०१५ मध्ये लेखापरीक्षा निरीक्षण केले. यात ८० ग्रामपंचायतींच्या १७७ पैकी १३६ वस्त्यांमध्ये २०२ कामे मंजूर होती. मात्र, यापैकी ७४ ग्रामपंचायतींमध्ये बृहत् आराखड्यात (डीपीआर) सन २०१३-२०१८ या पाच वर्षात प्रत्यक्ष लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसार, तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या २०११ च्या जनगणनेपेक्षा जास्त दर्शविली होती. ८० ग्रामपंचायतींचे डीपीआर तयार होते; मात्र त्यांचे स्वरूप समान नव्हते. ८०  पैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये निष्पादित केलेली ३४ कामे ही डीपीआरमध्ये समाविष्ट नव्हती. राज्यात २८ हजार ६ ग्रामपंचायती आहेत. १९७४ पासून दलितवस्ती सुधार योजना सुरू होऊन ग्रामपंचायतींना निधी हस्तांतरित केला जातो. ४१ वर्षांनंतर मुंबई महालेखाकार यांनी या योजनेच्या लेखांचे नमुनादाखल तपासणी केली असताना, ८० ग्रामपंचायती, आठ जिल्हा परिषद व १६ पंचायत समित्यांनी दलितवस्ती निधीचा विविध स्वरूपात बट्ट्याबोळ केल्याचे निदर्शनास आले. यात लोकसंख्या वाढवून दाखविणे, बृहत् आराखड्यात समाविष्ट कामाव्यतिरिक्त कामे करणे, दलित वस्त्यांशिवाय इतरत्र कामे करणे, विकासकामे मुदतीत न करणे, लेखे नियमानुसार न ठेवणे, मंत्रालय ते ग्रामपंचायत स्तरावर शासनादेश डावलून योग्य ते सनियंत्रण न करणे, समाजकल्याण अधिकाºयांनी एकाही कामाला भेटी न देणे, जि.प. कार्यकारी अभियंता लेखा संहिता १९६८ चे नियम १६६ नुसार कामाला भेटी न देणे, ग्रामपंचायतींनी कामाच्या ठिकाणी फलक न लावणे अशाप्रकारे गंभीर स्वरूपाच्या वित्तीय अनियमितता महालेखाकार कार्यालयाने शासनास कळविल्या आहेत. ८० ग्रामपंचायतींमधील नमुनादाखल तपासणीत कोट्यवधीचा घोटाळा २०१० ते २०१५ या पाच वर्षांमध्ये उघडकीस येत असेल, तर राज्यातील २८ हजार ६ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत किती कोटींचा घोटाळा झाला, याची चौकशी शासनाने करावी, घोटाळ्याला अभय देणाºया संवैधानिक लेखा कार्यालयाने जिल्हा स्तरावर जबाबदारी निश्चित करावी, असे कॅगने म्हटले आहे.  समाजकल्याण अधिका-यांकडून कामांची पडताळणी नाहीदलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सर्वच ८० ग्रामपंचायतींमध्ये झालेली विकासकामे जिल्हा समाजकल्याण अधिकाºयाने तपासली नाहीत. १३४ रस्ते, ८ समाजमंदिर, १३ सार्वजनिक प्रसाधनगृहे, ११ मलनि:सारण कामे, विद्युतीकरणाची ९ कामे व अन्य २७ कामांच्या तपासणीचे दस्तऐवज ‘कॅग’ ला मिळाले नाही, हे विशेष.   ४.७६ लाखांचे निष्क्रिय सौर दिवे  सन २०१३-२०१५ या दरम्यान ८० पैकी १७ ग्रामपंचायतींमध्ये १७० सौरऊर्जा पथदिवे लावण्यात आले. त्यापैकी ४.७६ लाख रुपये किमतीचे सौर दिवे निष्क्रिय असल्याचे ‘कॅग’ने तपासणीत स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती