शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सकल जैन समाजाचा सामूहिक निषेध मोर्चा, राजकमल चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत पायदळवारी

By गणेश वासनिक | Updated: July 20, 2023 17:11 IST

आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा सीबीआयने तपास करावा, अशी मागणी

अमरावती : कर्नाटकच्या चिक्कोडी जिल्ह्यातील हिरेकुंडी गावालगतच्या हरी पर्वत येथे विराजमान आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची असामाजिक तत्त्वांनी ६ जुत्ला निर्घृण हत्या केली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून, जैन समाजात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. 

आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा तपास सीबीआयने करावा, आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी गुरुवारी सकल जैन समाजाच्यावतीने राजकमल चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत पायदळ सामूहिक निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला, पुरुषांची लक्षणीय गर्दी होती.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात सकल जैन समाजाने आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांना विजेचा धक्का लावून बेशुद्ध करण्यात आले. नंतर त्यांच्या शरीराचे नऊ तुकडे करून ट्यूब वेलमध्ये फेकून दिले. ही घटना अमानवीय असून, यातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यात यावा, या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि जैन मुनी, संत आणि जैन मंदिरांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यात वक्फ बोर्डाच्या धर्तीवर जैन आयोगाची स्थापना करून समाजाला न्याय प्रदान करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

सामूहिक निषेध मोर्चात वात्सल्य फाऊंडेशन, सकल जैन समाज, मुनीसुव्रतनाथ दिंगबर जैन सैतवाल मंदिर, आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिर, आदिनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर, पार्श्वनाथ श्वेतांबर जैन बडा मंदिर, पार्श्वनाथ श्वेतांबर जैन सेनगण मंदिर, जैन दादावाडी, वर्धमान जैन स्थानक, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, चंद्रप्रभू दिंगबर जैन मंदिर, महावीर जैन मंदिर, जय जिनेंद्र ग्रुप, ओसवाल नवयुवक संघ, सैरवाल महिला मंडळ, परवार महिला मंडळ, भातकुली जैन मंदिर यासह जैन समाजातील महिला, पुरुषांची मोठी गर्दी होती.

टॅग्स :agitationआंदोलनAmravatiअमरावती