शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनासाठी वाहनांचे कलेक्शन, शासकीय यंत्रणांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:34 IST

 - गणेश वासनिक अमरावती - नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद विभागातून विविध शासकीय यंत्रणांची सुस्थितीत असलेली वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात राज्याचे अख्खे मंत्रालय नागपुरात असते. राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद ...

 - गणेश वासनिक 

अमरावती - नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद विभागातून विविध शासकीय यंत्रणांची सुस्थितीत असलेली वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात राज्याचे अख्खे मंत्रालय नागपुरात असते. राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, कॅबिनेट व राज्यमंत्री, प्रधान सचिवांसह मंत्रालयीन विभागाचे अधिकारी, कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा १५ दिवस मुक्काम ठोकतो. विदर्भाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने हिवाळी अधिवेशन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्री, सचिव, अधिकारी यांना ये-जा करता यावी, यासाठी त्यांच्या दिमतीला वाहनांचे कलेक्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्तांना सुस्थितीत असलेली वाहने गोळा करण्याचे कळविले आहे. त्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिका-यांचे सहकार्य घेण्याच्या सूचना आहेत. हिवाळी अधिवेशन काळात वाहनांवर होणारा इंधन व दुरुस्तीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयातून दिला जाणार आहे. नागपूर विभागातील मंत्री, राज्यमंत्र्यांची कार्यालयांना वाहने परस्पर न देता, विभागीय आयुक्तांमार्फत देण्याचा सूचना आहे. मंत्र्यांच्या शिबिर कार्यालयांना वाहने पुरविली जाणार नाही, ही बाब शासनाने स्पष्ट केली आहे. हिवाळी अधिवेशन काळात शासकीय वाहनांची कमतरता भासल्यास भाडेतत्त्वावर वाहने घेण्याचे अधिकार नागपूर विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांनी स्पष्ट केले आहे.

वाहने अधिग्रहणासाठी या विभागांना पत्रनागपूर येथे डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याकरिता मोठ्या संख्येने वाहने लागणार असल्याने शासनाने काही यंत्रणांना आपली वाहने देण्याबाबत पत्र पाठविले आहे. यात महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मूल्यांकन व राष्ट्रीयीकरण, रस्ते महामार्ग, मार्ग प्रकल्प मंडळ, पाटबंधारे अन्वेषण मंडळ, भूगर्भशास्त्र आणि खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य सेवा मंडळ, वनविभाग आदी विभागांचा समावेश आहे.

पोलीस विभागाच्या वाहनांचा सुरक्षेसाठी वापर हिवाळी अधिवेशनात राज्यपाल, मंत्री आणि अधिका-यांची सुरक्षा तसेच मोर्चे, आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे पोलीस विभागाची वाहने ही सुरक्षेसाठी वापरली जाणार असून, ती  मंत्री, सचिवांना दिमतीला राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :carकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार