शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

पोलीस आयुक्तालयात कोचिंग संचालकांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:30 IST

सुरत येथे एका कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकांची बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी शिकवणी वर्ग संचालकांना अग्निसुरक्षेविषयी मार्गदर्शन करून ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देअग्निसुरक्षेसंबधी सूचना : पोलीस उपायुक्ताचे मार्गदर्शन, महापालिका व अग्निशमन अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरत येथे एका कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकांची बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी शिकवणी वर्ग संचालकांना अग्निसुरक्षेविषयी मार्गदर्शन करून ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक, महापालिका व अग्निशमन दल अधिकारीदेखील उपस्थित होते.सुरत येथे चौथ्या मजल्यावरील एका शिकवणी वर्गाच्या खोलीमध्ये भीषण आग लागल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या. त्यामुळे २२ विद्यार्थ्यांचे जीव गेले. तेथील शिकवणी वर्ग संचालकाने अग्निसुरक्षेविषयी दक्षता न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना इमारतीवरून उड्ड्या माराव्या लागल्या. या घटनेमुळे राज्यभरातील खासगी शिकवणी वर्गाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात बुधवारी शहरातील शिकवणी वर्ग संचालकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला ६० ते ७० संचालकांनी उपस्थिती दर्शविली.या आहेत सूचनाबैठकीला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी संबोधित केले. अग्निसुरक्षेसंबंधी इमारतीतील फायर आॅडिट करणे आवश्यक आहे. शिकवणी वर्गाची इमारत स्वंतत्र असावी. आत-बाहेर जाण्याचे वेगवेगळे मार्ग, आग विझविण्याची यंत्रणा, संकटकालीन मार्ग असावा. प्रवेश व बहिर्गमनाचे छापील मॅप चिटकवून ठेवावा. त्यावर दिशानिर्देश द्यावे. एकाच इमारतीत अनेक व्यवसाय असतील, तर त्यातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना अन्नपदार्थ बनविताना काळजी घेण्यास सांगावे. सिलिंडरचा वापर काळजीपूर्वक करण्याच्या सूचना द्यावा. वर्गखोलीत मर्यादपेक्षा अधिक विद्यार्थी नकोत. अशा सूचना सातव यांनी दिल्या. महिला सुरक्षा, सीसीटीव्ही, मुलींचे वर्ग रात्री उशिरापर्यंत नको, पोलीस, अग्निशमनचे मोबाइल क्रमांकाचे फलके लावणे आदी सूचनासुद्धा देण्यात आल्या.

टॅग्स :Policeपोलिस