वाढत्या कोरोनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 05:00 AM2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:01:07+5:30

 ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

CM notice of rising corona | वाढत्या कोरोनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

वाढत्या कोरोनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Next
ठळक मुद्देकेंद्रीय पथकांचे रिपोर्टींग, विभागीय आयुक्तांना आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी तीन सदस्यीय केंद्रीय समितीने कोरोना संसर्गवाढीचा आढावा घेतला. पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणाचे रिपोर्टींग त्यांनी ८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना केल्यानंतर  अधिक सतर्क राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना केल्याची माहिती आहे.
 ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे १० महिन्यांच्या कालावधीत ८ फेब्रुुवारीपर्यंत २,५०,३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २३,३९३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. हा दर १२.५६ टक्के आहे. या कालावधीत हायरिस्कच्या ६७,५२९ जणांशी संपर्क आलेला आहे. हे प्रमाण १.९६ टक्के तर लो रिस्कमध्ये १,८२,७७० व्यक्तीशी संपर्क करण्यात आलेला आहे. हे प्रमाण ७.८४ टक्के आहे. मात्र  आरोग्य संचालकांनी एका कोरोनाग्रस्तामागे ३० कॉन्टक्ट ट्रेसींगचे निर्देश दिले असताना अमरावती जिल्ह्यात हे प्रमाण खूप माघारल्याने कोरोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप होत आहे.
आतापर्यंत २३,३९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यात ७८१८ पॅझिटिव्ह हे ग्रामीण भागातील आहे. यापैकी ७,३६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालकिा क्षेत्रात २५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर ग्रामीण भागात १६९ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७००५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३९८ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहे. आयसीयूमध्ये ८१ रुग्ण आहेत तर २ रुग्णाला व्हेंटीलेटर लागले आहे. २८० ऑक्सिजन बेडपैकी ६२ बेडवर रुग्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अहवालात नमूद आहे.
 

१०,८७४ जणांना कोरोनाची लस
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात १०,८७४ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. यासाठी केंद्रही वाढविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २१ बुथवर लसीकरणाचे सत्र सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महसूलसह शासकीय यंत्रणांना कोरोनाची लस व काळजी घ्यायच्या टिप्स देण्यात येत आहे. 

असिम्टमॅटिक रुग्णांचा खुलेपणाने वावर
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य संचालकांनी एका रुग्णामागे किमान ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे. जिल्ह्यात मात्र, जिल्ह्यात मात्र हे  प्रमाण १० टक्कयांवरच असल्याने असिम्टमॅटिक रुग्ण बाहेर मोकळेपणाने वावरत आहे. त्यामुळेही काही प्रमाणात संसर्ग वाढल्याची वस्तूस्थिती आहे.
 

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचे पालन करण्यासोबतच ज्या भागात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे, तेथे चाचण्या वाढविणे, याशिवाय रुग्णालयातील बेडची स्थिती, औषधींचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सुचना आहेत.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 

Web Title: CM notice of rising corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.