जिल्हाधिकारी : जलशुद्धीकरण यंत्रण कार्यान्वित समारंभअमरावती : ज्या गावतील वातारण स्वच्छ व सुदंर आहे व सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळते अशा गावांत रोगराईचे प्रमाण नसते. त्यामुळे लहान मुलांची बौध्दिक क्षमता अतिशय उत्तम असते. अशा गावांतील मुलं- मुली अनेक क्षेत्रात अतिशय उच्चप्रतिची प्रतिभा दाखवून आपले भवितव्य घडवू शकते. या नवतरूणाईतूनच आपला देश समृध्द होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. बुधवारी भातकुली तालुक्याकतील सुकळी येथील ग्रामपंचायत येथे अनाडे फाऊंडेशन मुंबई तथा संचालक पाणीपुरवठा व स्वच्छता सहायक संस्था व बी.के. सवाई यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुकळी येथे जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित समारंभाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणालेत जर खेडे गावातील मुल मोठे होऊन कलेक्टर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक , डॉक्टर झाले तर ही मंडळीच या देशाला समृध्द करू शकतात असे गित्ते म्हणालेत. यावेळी सीईओ सुनील पाटील यांनी आपले विचार मांडतांना म्हणालेत सुकळी ग्रामपंचायत सारखी अनेक गावे या जिल्ह्यात आहेत. त्यांना सुध्दा विविध स्तरावर पाठबळ देऊन समृध्द करणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा जिल्हा निर्मल होणार नाही, तो पर्यंत या जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना आपण खऱ्या अर्थाने मानता, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला संजय इंगळे, अनाडे फाऊंडेशनचे रूजन धुलीया,प्रणय जैन, बिडीओ प्रमोद कापडे, सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक कुमार खेडकर यांनी केले. (प्रतिनिधी)
स्वच्छतेतून घडू शकतो समृध्द भारत
By admin | Updated: December 24, 2015 00:10 IST