शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी? पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 14:16 IST

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर ते चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचे बोलले जाते.

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार आणि राजू शेट्टींमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचेही म्हटले जात होते. तर,आता त्यांना पक्षातून नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी हे अमरावती दौऱ्यावर आहेत. अशावेळी या कारवाईसंदर्भात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुयार हे आमदार झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चळवळीशी अंतर ठेवून असल्याची खदखद स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे. मला विश्वासात घेतलं तर आपण  सोबत असेल नाही घेतलं तर त्यांच्याशिवाय असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला होता. तर, आता त्यांच्याच हकालपट्टीची शक्यता आहे.

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर त्यांची पक्षातील सक्रियता कमी झाली असल्याचे बोलले जात आहे. ते कार्यकर्त्यांना सहकार्य करत नसतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नसतील तर ते आमदारही आम्हाला नको आहे, अशी भूमिका स्वाभिमानी विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अमरावतीच्या हिवरखेड येथील राजू शेट्टीच्या सभेच्या बॅनरवरही भुयार यांचा फोटोही गायब आहे. अशावेळी, आज राजू शेट्टींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीAmravatiअमरावती