कर्मचाऱ्यांसोबत वाद : हॉकर्स व्यावसायिकांविरुद्ध कारवाईअमरावती : स्थानिक नगर वाचनालय व जयस्तंभ चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारे हॉकर्स व्यावसायिकांचे अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. हे अतिक्रमण काढताना हॉकर्स व्यवसायिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांसोबत वाददेखील घातला.नवरात्रौत्वात रस्तालगतच्या हातगाड्या, हॉकर्स व्यवसायामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहीम युद्धस्तरावर राबविली जात आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जयस्तंभ चौकात वाहतुक ीस अडथळा ठरणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या जप्त करण्यात आला आहेत. नगर वाचनालयसमोरील रस्त्यावर हॉकर्स व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले. हातगाड्या, पानठेले जप्त करताना हॉकर्स व्यवसायिकांनी वाद घातला. मात्र आयुक्तांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे, ही भूमिका अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी घेतल्यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. (प्रतिनिधी)रोहित डेअरी, 'किंग स्टार' रडारवरबडनेरा मार्गावरील रोहित डेअरी, जवाहर मार्गावरील किंग स्टार प्रतिष्ठानाने केलेल्या अतिरिक्त बांधकाम कामावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. बांधकामाची मंजूर परवानगी तपासली जाणार आहे. त्याकरिता प्रतिष्ठानच्या संचालकांना नोटीस बजावण्यात आली असून शनिवारी परवानगीचे कागदपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या प्रतिष्ठानांवर महापालिकेचा हातोडा पडणार असल्याची माहिती गणेश कुत्तरमारे यांनी दिली.
नगर वाचनालय, जयस्तंभ चौकातील अतिक्रमण काढले
By admin | Updated: October 17, 2015 00:21 IST