शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनआरसीला तालुक्यातील नागरिकांचे समर्थन; लोकाधिकार मंचचा पुढाकार, बाजारपेठ बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:49 IST

लोकाधिकार मंच आणि विविध शेकडो संघटनाच्यावतीने सकाळी १० वाजता समर्थन रॅलीला सुरुवात झाली.

वरूड (अमरावती) : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शनिवारी शहरातून महारॅली काढण्यात आली. मराठी शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या या महारॅलीत हजारो नागरिक, व्यापारी सहभागी झाले. हातात भगवे झेंडे आणि तिरंगा घेऊन, वंदे मातरम्च्या जयघोषात देशात हा कायदा त्वरित लागू करण्याची मागणी करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून व्यापाºयांनी रॅलीत सहभाग नोंदविला. 

लोकाधिकार मंच आणि विविध शेकडो संघटनाच्यावतीने सकाळी १० वाजता समर्थन रॅलीला सुरुवात झाली. पोलीस ठाण्यापासून सावता चौक, मेन रोड, महात्मा फुले चौकातून पुढे आल्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, मोरेश्वर वानखडे, लोकेश अग्रवाल, गिरीधर देशमुख, जगदीश उपाध्याय, नगराध्यक्षा स्वाती आंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे यांनी सुधारित नागरिकत्व कायदयाच्या समर्थनार्थ मार्गदर्शन केले.  भारतमातेच्या वेशभूषेत चिमुकलीसुद्धा व्यासपीठावर होती. गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. विरोधक केवळ राजकारण करीत असून देशहिताच्या या कायद्याला सर्वांनी समर्थन द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.  

या महामोर्चात लोकाधिकार समितीचे इंद्रभूषण सोंडे, नरेश घोडसाडे, जया नेरकर, माया यावलकर, सोनल चौधरी, राजू सुपले, युवराज आंडे, नंदू विघे, मंगेश ढोरे, अशोक नानोटकर, विक्रम काळे, संदीप तरार, आनंद खेरडे, कैलास उपाध्याय, रितेश शहा, गोपाल मालपे, हेटे, दिलीप राठी, किशोर भगत, रमेश हुकूम, संतोष निमगरे, मनोज माहूलकर, मनोज गुल्हाणे, दिलीप टाकरखेडे, प्रवीण खंडेलवाल, देवेंद्र बोडखे, शिवा शिवहरे, युवा व्यापारी संघ, बजरंग दल, तालुका व्यापारी संघटना, महिला विकासमंच, भाजपा व्यापारी संघटना, जॉयन्ट्स ग्रुप, ओबीसी मंच, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, आर्ट आॅफ लिव्हिंग आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Amravatiअमरावती