शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाला पुन्हा सिबिल सक्ती; बँकांवर कारवाई करणार का?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 1, 2023 19:00 IST

जिल्हाधिकारीच काय, पण उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही जुमानेनात; ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी त्रस्त

गजानन मोहोड

अमरावती - ‘एसएलबीसी’चा निर्णय झाला असल्याने बँकांनी पीककर्जासाठी सिबिल स्कोअर मागू नये, अन्यथा फौजदारी दाखल करण्यात येईल, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मे रोजी जिल्हा बैैैठकीत दिले होते. प्रत्यक्षात काही प्रकरणात बँकांद्वारा सिबिल स्कोअरची मागणी होत आहे. याविषयी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीदेखील निर्देश दिले असताना बँका जुमानत नसल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भातकुली शाखेमध्ये बोरगाव येथील निखिल नागपुरे यांनी पीककर्जासाठी अर्ज केला व बँकेनीही हा अर्ज मंजूर केला व नंतर ६०० पेक्षा कमी सिबिल स्कोअर असल्याचे कारण दर्शवित नामंजूर केला असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कर्ज प्रकरणासाठी नागपुरे यांनी दोन महिने पायपीट केली. प्रत्यक्षात त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे व यासाठी त्यांनी कोरोना काळात एका खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते व त्याचा नियमित भरणा सुरू आहे. यापूर्वीचे पीककर्ज निल असल्याने त्यांनी बँकेकडे पीककर्जाची मागणी केली होती. बँकेनेही कर्ज मंजूर असल्याचे कळविले व आता सिबिल स्कोअरचे कारण दर्शवित प्रकरण नामंजूर केल्याचा आरोप नागपुरे यांनी केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज