शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

कॉलरा दोन पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:43 IST

उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा परिणाम : आरोग्य विभागाने घेतले नमुने

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे. दूषित पाण्याचा हा परिणाम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.येथील राजापेठस्थित एका खासगी रूग्णालयात १६ मार्च रोजी कॉलरा आजाराचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. या रूग्णालयातून महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर त्या रूग्णांचे १८ मार्च रोजी शौच नमुने तापसणीसाठी पाठविण्यात आले. हल्ली शहरात नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. अनेक ठिकाणी नाली खोदकामांमुळे जलवाहिनींचे लिकेजसमधून घाण पाण्यावाटे जात असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात साथरोगाची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान स्थानिक गणेशनगर येथील एका २० वर्षीय रूग्ण असलेल्या मुलीला तीन दिवसांच्या उपचारानंतर सुटी देण्यात आली, तर साईनगरातील एका ५० वर्षीय महिलेवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती रूग्णालयाकडून मिळाली आहे. रूग्णांवर उपचार सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी महापालिका आरोग्य विभागाने नमुने घेतल्यामुळे प्रयोगशाळेच्या अहवालात तफावत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.काय आहे कॉलरा?कॉलरा हा एक प्रकाराचा डायरियापेक्षा गंभीर आजार आहे. यामुळे सतत शौचाला जावे लागते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन किडनी व इतर अवयव निकामी होण्याची शक्यता असते. यामुळे पोटात वेदना होतात. गतीने पाण्याचे प्रमाण कमी होते. त्वरित उपचार न केल्यास जीवाला धोका होऊ शकतो.यामुळे होतो कॉलरा?दूषित पाणी पिण्यात आल्याने व उघड्यावरील अन्न खाल्ल्याने कॉलराचे जंतू पोटात जातात. हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे.आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होऊ शकते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. वेळीच उपचार झाल्यास बरे होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागू शकतो.दोन्ही रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. मात्र, या रुग्णांचे नमुने निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.- डॉ. सीमा नेताम, आरोग्य अधिकारी महापालिकादोन्ही रुग्णांचे शौच नमुने कॉलरा पाझिटिव्ह आल्याने याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास दिली. उपचारानंतरच्या नमुने तपासणी अहवालामध्ये फरक पडतो.- डॉ. मनोज निचत, एमडी