शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून चिमुकले आंदोलनात, रात्रीही जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचन प्रकल्पांनी बाधित झालेल्या लाखो प्रकल्पग्रस्तांचे न्याय प्रश्न घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने ४ मार्चपासून प्राणांतिक महाउपोषण आरंभले आहे. विदर्भातून सर्वदूरचे प्रकल्पग्रस्त महिलांसह त्यात सहभागी झाले असताना, गुरुवारी या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनीही शाळा सोडून आंदोलनात उडी घेतली. अमरावती विभागातील ५०पेक्षा अधिक मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, उपोषणाच्या सातव्या दिवशीही प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. सुमारे ५०० जण या महाउपोषणात सहभागी झाले आहेत. दिवस-रात्र त्यांचा कंठशोष सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक मंडप उपोषणकर्त्या महिलांनी भरला असताना गुरुवारी त्यात प्रकल्पग्रस्तांची मुलेदेखील शाळा सोडून सहभागी झाली आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी १२ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील रंजना कुचे व सुलभा ढोंडे यांना गुरुवारी पहाटे  इर्विनमध्ये हलविण्यात आले. शासन-प्रशासन शाश्वत उपाययोजना करायला तयार दिसत नसल्याने  शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकरी उपोषणापासून मागे हटायला तयार नाहीत.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर शासन भानावर येणार का, असा प्रश्न उपस्थित शेतकरी विचारत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या धुडकावून शासन-प्रशासन आमच्या उपोषणमंडपी शेतकरी शहीद स्मारक उभारणीची तयारी करीत असल्याच्या संतप्त भावना उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती करीत आहे.

रात्रभरही उपोषण४ मार्चपासून अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील शेकडो प्रकल्पबाधित महाउपोषणात सहभागी होत आहेत. त्यात महिलांचा सहभाग दखलनीय आहे. आता त्यात त्यांची चिमुकलीही सहभागी झाल्याने उपोषण मंडपाला ‘प्रकल्पग्रस्तांचे कुटुंब’ अशी नवी उपाधी मिळाली आहे. उपोषण मंडपाशेजारी दररोज दोन्हीवेळचे भोजन शिजत असून, सलग सात रात्री उपोषणकर्त्यांनी जागून काढल्या आहेत.

अशा आहेत मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेेदीधारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला द्यावा. महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ते शक्य नसल्यास एकरकमी २० लाख रुपये देण्यात यावे. विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक समस्या तातडीने निकाली काढाव्यात.

 

टॅग्स :agitationआंदोलन