शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूनंतर नातलगांचा उद्रेक, धामणगावात हॉस्पिटल साहित्याची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 21:30 IST

धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने आक्रमक झालेल्या नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावली. तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांना अश्रुधूर व लाठीहल्ला करावा लागला. परिणामी धामणगावात काही काळ कर्फ्यूसदृश स्थिती निर्माण झाली होती.प्राप्त माहितीनुसार, समुद्रपूर नजीकच्या मांडगाव येथील प्रशांत ठाकरे यांची मुलगी निधी तिच्या आईच्या माहेरी धामणगाव तालुक्यातील कावली येथे आली होती. पायावर लोखंडी वस्तू पडल्याने तिला ताप आला. तिला धामणगाव येथील डॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती खालावत गेली. यादरम्यान डॉक्टरांनी उपचाराचे १५०० रुपये जमा करा, मुलगी काही वेळाने शुद्धीवर येईल, असे सांगितले. दोन तासांनंतर मात्र लगेच नागपूरला घेऊन जा, असे सांगत असतानाच निधीच्या नाका-तोंडातून फेस बाहेर पडला. ती दगावली. ही वार्ता शहरात वा-यासारखी पसरली.सकाळी १० वाजता घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांचा रोष वाढतच गेला. अखेर चार तासांनी डॉ. अशोक सकलेचा व डॉ. सारिका सकलेचा या डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. नागरिकांचा रोष पाहता, या दाम्पत्याला चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी संतप्त नागरिकांवरही लाठीहल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार घटनास्थळी पोहोचले. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सने रुग्णालय परिसराचा ताबा घेतला आहे.कारसह साहित्याची जाळपोळसुमारे तीन हजारांवर जमावाने हॉस्पिटलची तोडफोड सुरू केली. हॉस्पिटलमधील काचा, खिडक्या फोडल्या. खाटा, कुलर व अन्य साहित्य बाहेर काढून आगीच्या स्वाधीन करण्यात आले. टीव्हीची तोडफोड केली, तसेच घराजवळ पार्क केलेली डॉ. सकलेचा यांची नवी कार व दुचाकीही जाळण्यात आली.

टॅग्स :Amravatiअमरावती