शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह, गर्भधारणा अन् अर्भकासह मातेचाही मृत्यू! पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: July 12, 2023 16:37 IST

Amravati News बालविवाहापश्चात ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. छातीत दुखू लागल्याने तिला कुटुंबियांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे पोटातील अर्भक गुदमरल्याने त्या भृणासह त्या अल्पवयीन मातेचाही करूण अंत झाला.

प्रदीप भाकरेअमरावती: बालविवाहापश्चात ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. छातीत दुखू लागल्याने तिला कुटुंबियांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे पोटातील अर्भक गुदमरल्याने त्या भृणासह त्या अल्पवयीन मातेचाही करूण अंत झाला. ११ जुलै रोजी हा प्रकार अमरावतीत उघड झाला.

             याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरा, व चार महिला अशा एकूण सात जणांविरूध्द सदोष मनुष्यवध, बलात्कार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यातील मृत पिडिता ही हिंगोली जिल्ह्यातील असून, घटनास्थळ त्याच जिल्ह्यातील बाभुळगाव आहे. त्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार आहे.

१६ वर्षांच्या पिडिताचा गतवर्षी  बालविवाह करण्यात आला. लग्न झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान सहा महिन्यांची गर्भवती असताना १० जुलै रोजी तिच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला येथील जिल्हा सामान्य रूग्णालय व पुढे एका खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, हृदयविकाराने तिचे गर्भातील भृण गुदमरले व पोटातच दगावले. त्यानंतर ११ जुुलै रोजी पहाटे दोनच्या सुमारास ‘आयरन डेफिसिएंशी ॲनिमिया’ ने त्या अल्पवयीन मुलीचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अल्पवयीन मुलीचा व तिच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाला देखील देण्यात आली. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी येथील ते खासगी रूग्णालय गाठून मृत मुलीच्या आईसह कुटुंबियांचे बयाण नोंदविले. तो विवाह संमतीने झाला होता, असेही बयाणात सांगण्यात आले. मात्र, मृत पिडिता ही अल्पवयीन असल्याने बलात्कार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

हृदयाशी संबंधित आजाराने तिच्या पोटातील बाळ गुदमरल्याने अल्पवयीन मातेचा मृत्यू झाला. मृत पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून सात जणांविरूध्द मंगळवारी गुन्हा दाखल केला. तो हिंगोली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येईल.गजानन गुल्हाने, ठाणेदार, गाडगेनगर

टॅग्स :Deathमृत्यू