शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

चिखलदरा पर्यटन ६ अंश सेल्सिअस; विदर्भाच्या नंदनवनात हुडहुडी रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:52 IST

Amravati : ढगाळ वातावरण हटल्याने रविवारपासून कडाक्याची थंडी

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : आठवड्याभरानंतर ढगाळ वातावरण हटल्याने रविवारपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. तापमानात घट झाली असून, मंगळवारी पहाटे ५ वाजता विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळाचा पारा ६ अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला होता. तर, ७ वाजता ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यामुळे संपूर्ण परिसर पूर्णतः गारठला होता. 

आठवड्याभरानंतर थंडीने पुन्हा कमबॅक केले आहे. तापमान पाच ते सहा अंशांनी घटले आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कडाक्याची थंडी पडत असताना अचानक थंडीमुळे गारठलेला परिसर सामान्य तापमानावर आला होता. शनिवार, रविवारपासून पुन्हा कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दिवसरात्र गरम कपडे व शेकोटीजवळ बसून थंडीपासून मेळघाटातील आदिवासी बांधवांना स्वतःची संरक्षण करावे लागत असल्याचे चित्र आहे. 

अचानक घटले तापमान जिल्ह्यात ढगाळ वातावरण दूर आल्यानंतर तीन दिवसांपासून तापमानात सतत घट येत असताना चिखलदरा पर्यटनस्थळावर मंगळवारी पहाटे ५ वाजता ६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. मध्यरात्री २ ते पहाटे ४ या वेळेत ते ७ अंश सेल्सिअस होते, त्यानंतर पुन्हा ६ नंतर ७ अंश सेल्सिअस होते. सकाळी ७:३० वाजता ८ अंश सेल्सिअसची नोंद गुगलवरसुद्धा जाली आहे.

चिखलदऱ्यात तापमान नोंदीचे यंत्र नाही विदर्भाचे नंदनवनात विकासकामाचर कोट्यवधीचा खर्च होत आहे. पण, येथील एका खासगी महाविद्यालयातील जुन्या यंत्रावर तापमान नोंदीसाठी अवलंबून राहावे लागते, प्रशासकीय स्तरावर नगरपालिका, तहसील कार्यालय किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत या थंड हवेच्या ठिकाणी आधुनिक संगणकीय तापमान यंत्र बसविणे गरजेचे आहे. 

थंडीत अनुभवण्यासाठी येतात पर्यटक चिखलदरा वेथील पर्यटनस्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, कोलकास येथील जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कडाक्याच्या थंडीत वाढली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक मुसळधार पावसात आणि थंडीत सारख्याच संख्येने येत असल्याचे चित्र आहे. त्याला कारणीभूत येथील शुद्ध, स्वच्छ पर्यावरण आहे.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती