शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा ‘क्लास’; तब्बल चार तास ‘व्हीसी’

By गणेश वासनिक | Updated: March 1, 2025 18:36 IST

देवाभाऊंची कमाल : सात हजार अधिकाऱ्यांची हजेरी; १० विभागांनी मारली दांडी

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी तालुका स्तरावरील एकाचवेळी सलग चार तास ‘व्हीसी’वर ‘क्लास’ घेतल्याने तब्बल सात हजार अधिकारी थकून गेले होते. मात्र, देवाभाऊंनी न थकता १०० दिवसांचा आढावा घेऊन शासकीय अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरवली. त्यामुळे आता ‘एआय’सारखे तंत्रज्ञान अधिकाऱ्यांंना हाताळावे लागणार आहे.

शासन लोकाभिमुख करणे आणि सुस्तावलेल्या प्रशासनाला अगोदर जागे करण्याची गरज असल्याची बाब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. पारदर्शक प्रशासनाची हमी देत शासकीय कार्यालयांना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला. लोकांचे प्रशासकीय जीवनमान सुकर करण्यासाठी राज्यातील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारीसुद्धा कामाला लागले आहेत. एक महिन्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामाचा आढावा गुरूवार, २७ फेब्रुवारी रोजी घेतला, हे विशेष. 

चार तास ‘व्हीसी’वर मुख्यमंत्री१०० दिवसांमध्ये राज्यातील ५० विभाग आणि १३ महामंडळांनी किती ‘दिवे’ लावलेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारीमंत्रालयापासून तर तालुकास्तरावर अधिकाऱ्यांना ‘क्लास’ घेतला. मुख्यमंत्री सलग चार तास ‘व्हीसी’वर बसून होते. मात्र काहीतासातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीद्वय बाहेर पडले. सरतेशेवटी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाआणि पारदर्शक प्रशासनाची हमी भरली.

सात हजार अधिकारी ‘व्हीसी’मध्ये हजरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयात राज्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‘व्हीसी’वर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्यांदाच प्रधान सचिवांपासून तर थेट तालुकास्तरीय अधिकाऱ्यांंचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात १०० दिवसांमध्ये ई-ऑफिस, एआयचा वापर, सायबर गुन्हे, सुकर जीवनमान, अत्यावश्यक सेवा, स्वच्छता, नीटनिटके कार्यालय, वृक्षारोपण आदी विषयांचा आढावा स्वत: मुख्यमंत्र्यांनी घेतला.

१५ विभागांकडून पीपीटी सादर१०० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने कुठल्या विभागाने कशी कामगिरी बजावली याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशन(पीपीटी) द्वारे घेतला. यावेळी १५ विभागाने पीपीटी सादर केले. यात मृद व जलसंधारण, आदिवासी विकास विभाग, बृहन्मुंबई पोलिस, पालघर, सातारा पोलिस, छत्रपती संभाजीनगर पोलिस महानिरीक्षक, चंद्रपूर, ठाणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, अमरावती, जळगाव व नागपूर जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, मुख्य कार्यपालन अधिकारी धुळे, प्रधान सचिव गृह आदी अधिकाऱ्यांनी १०० दिवसांमध्ये केलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली. पोलिस विभागाने ‘एआय’च्या वापरासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये परिवहन, वनविभाग, कृषी, लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य, पर्यटन आणि शिक्षण विभाग कुठेही ‘पीपीटी’त दिसले नाहीत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावती