शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

घरच्या घरी तपासा बियाण्यांंची उगवणशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करा. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाका.

ठळक मुद्देसोयाबीन : खरिपाच्या पार्श्वभूमीवर फसगत टाळा, बीजप्रक्रिया आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसला/शेंदूरजनाघाट : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बियाणे उगवण तपासणीची सोपी पद्धत कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी, असे आवाहन करण्यात आली आहे.घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करा. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाका. त्याची गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा आणि अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवा. ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. तिन्ही गुंडाळीतील ७० वा त्यापेक्षा जास्त दाण्याला कोंब असल्यास हे बियाणे दर्जेदार आहे. १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति तीन किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीपासून संरक्षणासाठी प्रक्रिया करावी, असे वरूड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.अशी करा पेरणीउगवण झालेल्या बियाण्यांची टक्केवारी ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. ७० टक्क््यांपेक्षा कमी बियाणे उगवले असेल, तर त्या प्रमाणात बियाण्यांची मात्रा जास्त वाढविल्यास बाजारातील बियाण्याएवढीच रोपाची संख्या राहून अपेक्षित उत्पादन येते. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी ३० किलो बियाणे वापरावे. ६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे. ६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे. ५० टक्के पेक्षा कमी उगवण असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.

टॅग्स :agricultureशेती