शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

धर्मादाय आयुक्त घेणार का दखल ?

By admin | Updated: October 27, 2015 00:13 IST

अंबा व एकवीरा देवी संस्थानातर्फे पत्रिका वाटून निमंत्रितांनाच महाप्रसादाकरिता बोलविण्यात आल्याने हजारो नागरिक वंचित राहिलेत.

नागरिकांची मागणी : अंबा, एकवीरेचा महाप्रसाद व्हावा सर्वांसाठी खुलाअमरावती : अंबा व एकवीरा देवी संस्थानातर्फे पत्रिका वाटून निमंत्रितांनाच महाप्रसादाकरिता बोलविण्यात आल्याने हजारो नागरिक वंचित राहिलेत. हा सर्रास भेदभाव असून धार्मिक स्थळांच्या उद्देशपूर्तीकडे आता धर्मदाय आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी भक्तांची मागणी आहे.देव हा सर्वासाठी सारखाच आहे. मग, महाप्रसादासाठी भेदभाव का? असा सवाल अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे. सोमवारी अंबादेवी, एकवीरा देवी संस्थानतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, विश्वस्तांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण देऊन बंदद्वार महाप्रसाद दिला. त्यामुळे हजारो भाविक यापासून वंचित राहिले आहेत. अनेक भाविकांना प्रवेशद्वारापासून अक्षरश: पिटाळून लावण्याचा अश्लाघ्य प्रकार देखील यावेळी दिसून आला. त्यामुळे विश्वस्तांची मनमानी किती वाढली आहे, हे स्पष्ट झाले. महाप्रसादाची अपेक्षा घेऊन आलेल्या हजारो भाविकांना अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरातून महाप्रसाद न घेताच परतावे लागले. ‘अंबा -एकवीरे’च्या महाप्रसादात भेदभाव का? या मथळ्याखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच शहरात खळबळ उडाली. या वृत्ताचे हजारो सामान्य भक्तांनी समर्थन केले.चौकशीची मागणीअमरावती : धार्मिक स्थळांच्या उद्देशपूर्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भक्तांनी केली आहे. धार्मिक स्थळे ही सर्वासाठीच खुली असतात, असावीत. दर्शनाप्रमाणेच महाप्रसादाचाही लाभ सर्व भाविकांना मिळायला हवा, अशी मागणी आता जोर धरत आहे. धार्मिक स्थळांना धर्मदाय आयुक्त कार्यालयाने काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमांची उद्देशपूर्ती करण्याचे काम संस्थानचे आहे. आता धर्मदाय आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.शहरातील मोठमोठ्या धार्मिक स्थळांमध्ये विश्वस्तांची मनमानी सुरू आहे. भिकारी देवस्थानांसमोर बसणार नाहीत, तर कुठे जाणार? संस्थानचालक देवस्थानमाफिया बनले आहेत. त्यांची चौकशी व्हावी.- अविनाश ढगे, माजी व्यवस्थापक, साईबाबा ट्रस्ट.