लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निर्धन व दुर्बल रुग्णांनासवलतीच्या दरात उपचार सुविधा मिळावी, याकरिता जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण १५ धर्मादाय रुग्णालये आहेत. येथे गरीब रुग्णांसाठी दहा टक्के खाटा या राखीव ठेवणे बंधनकारक आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या एक वर्षाच्या कालावधीत २ कोटी ६२ लाख ७२ हजार ४५८ रुपये इतका खर्च रुग्णांवर केल्याची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिली. जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवल्याचे दिसून येते. या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतो की नाही, यावर सहायक धर्मादाय आयुक्त यांची निगराणी असते.
१५ धर्मादाय रुग्णालयजिल्ह्यात १५ धर्मदाय रुग्णालये आहेत. निर्धन व दुर्बल घटकाकरिता दहा टक्के खाटा राखीव असल्याने वर्षभरात ६ हजार ४४७ रुग्णांना याचा लाभ झाला आहे.
प्राप्त निधीपेक्षा खर्च जास्तजिल्ह्यात १ कोटी १९ लाख ९८ हजार ३५४ इतका निधी होता. खर्च मात्र २ कोटी ६२ लाख ७२ हजार इतका झाला.
दर महिन्यास आढावा बैठकधर्मादाय रुग्णालयांची दर महिन्यास आढावा बैठक होते. रुग्णांच्या अडचणी असल्यास त्याचे निवारण करण्यात येते.
निर्धन रुग्णांना लाभ२०२४ या वर्षभरात निर्धन ५ हजार ६२९, तर दुर्बल गटातील ७५५ रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाचा लाभ मिळाला.
"जिल्ह्यात एकूण १५ धर्मादाय रुग्णालये आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात ६ हजार ४४७ रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ झाला आहे."- जावेद खान पठाण, रुग्णालय निरीक्षक