शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

4 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल, आयोगाचे निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 6:20 PM

राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला.

अमरावती : राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला. यामध्ये दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाला दोन दिवसांची मुदतवाढ दिली. आता पहिल्या टप्प्यात २५ फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात १ ते ६ मार्च या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ ते १० फेबु्रवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, यामध्ये संगणकीकृत पद्धतीने अर्ज व शपथपत्रे दाखल करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांतून आयोगाला प्राप्त झाल्याने आता आयोगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदान २५ फेब्रुवारी व मतमोजणी २६ फेब्रुवारीला होणार आहे. राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणा-या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व  ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील अंशत: बदल करण्यात आला. यामध्ये  १२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १४ ला छाननी, १६ ला उमेदवारी अर्जाची माघार व चिन्हवाटप, २७ फेब्रुवारीला मतदान व २८ ला मतमोजणी होणार आहे. कोकण विभागात ३९, नाशिक ७५, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १० व नागपूर विभागात २२ ग्रामपंचायतींमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहेत.

४ हजार १०१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक सध्या राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये कोकण विभागात ६४६ ग्रामपंचायतींमध्ये १०८२, नाशिक विभागात ६६३ ग्रामपंचायतींमध्ये १०७२, पुणे विभागात ९६९ ग्रामपंचायतींमध्ये १८३४, औरंगाबाद विभागात ६९३ ग्रामपंचायतींमध्ये ९५९, अमरावती विभागात  ५९२ ग्रामपंचायतींमध्ये ९०७, तर नागपूर विभागात ५३८ ग्रामपंचायतींमध्ये १०१७ सदस्यपदे रिक्त असल्याने निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.