शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

चांदूर रेल्वे नगर परिषदेने पटकावले ५० लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:53 IST

माझी वसुंधरा अभियान : अमरावती विभागातून तिसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये १५ हजार ते २५ हजार लोकसंख्येच्या गटात चांदूर रेल्वे नगर परिषदने अमरावती विभागातून तिसरा क्रमांक पटकावीत ५० लाख रुपये बक्षीस पटकावले.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ला राबविण्यास सुरुवात झाली होती. 'माझी वसुंधरा अभियान ४.०' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकासंख्यानिहाय विजेत्या संस्थांची २७ सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली. यात अमरावती विभागातून चांदूर रेल्वे नगर परिषदेने तिसरा क्रमांक पटकावून ५० लाख रुपये पारितोषिक रक्कम प्राप्त केले. याकरिता मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, आरोग्य निरीक्षक राहुल इमले, लेखापाल संदीप माहुरे, रचना सहायक आशिष कुकळकर, कर निरीक्षक शारदा कावडे, संगणक अभियंता योगेश वासनिक, पाणीपुरवठा अभियंता परिमल देशमुख, लिपिक जितेंद्र कर्से, कर्मचारी विशाल सुरकार, राजेश शिर्के, अनंत वानखडे, पंकज इमले, मनीष कनोजे, संगीता इमले, संजय कर्से, शहर समन्वक पल्लवी जामोदकर व इतर कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले. 

"शहर स्वच्छता, पर्यावरणपूरक उपायोजना, वृक्षारोपण आणि हरित शाश्वतेबाबत केलेल्या कामगिरीमुळे मिळालेले हे बक्षीस शहरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. हा सन्मान भविष्यात आणखी प्रेरणादायी होईल .पर्यावरणासाठी सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करेल." - डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी

"स्वच्छ चांदूर, सुंदर चांदूर करण्यास व माझी वसुंधरा अभियानमध्ये नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व त्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश संपादन झाले. असेच नागरिकांनी सहकार्य करावे. हे पारितोषिक नगरपरिषदेसह संपूर्ण शहरवासीयांचे आहे." - राहुल इमले, आरोग्य निरीक्षक

टॅग्स :AmravatiअमरावतीChandur Railwayचांदूर रेल्वे