शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

सोलापूरकडे निघालेल्या चंदनाला फुटले पाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:01 IST

वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती.

ठळक मुद्देवनाधिकाऱ्यांनी नेले २४४ किलो : भरले २३५ किलो

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वनाविभागाने सोलापूरला पाठविलेल्या चंदनाला पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट वनपरिक्षेत्रातील २४४ किलो चंदन कार्टीन चलानसह फिरते पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत सोलापूर वनविभागाकडे पाठविण्यात आले होते. सोलापूरला ते चंदन संबंधित वनाधिकाऱ्यांनी मोजले तेव्हा २३५ किलो भरले. कमी भरलेल्या या चंदनाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती. ठिकठिकाणाहून वनविभागाने आपल्याकडील चंदन यवतमाळला पाठविले. यात यवतमाळचे गोडाऊन हाऊसफुल्ल झाले.दरम्यान, मेळघाटकडील चंदन सोलापूरला मागवण्यात आले. पश्चिम मेळघाट वनविभागाकडील आकोट येथून ११३ किलो चंदन फेब्रुवारी २०१९ मध्ये सोलापूरला पाठविले गेले. पूर्व मेळघाटमधील जारिदा व अन्य ठिकाणावरील चंदन वनविभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवले गेले. अंजनगाव येथील पोलिसांनी पकडलेले व पश्चिम मेळघाटचेही चंदन याच गोडाऊनमध्ये होते. अंजनगावचे चंदन पोलिसांनी पकडल्यामुुळे ते सोलापूरला न पाठवता अंजनगावला परत केले गेले. हे चंदन ठेवून घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी अंजनगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दुर्लक्षित अवस्थेत तसेच पडून आहे.चंदनाची चोरीवनविभागाच्या आवारातील परतवाडा गोडाऊनमधून २७ किलो चंदन चोरट्यांनी पळविले आहे. उत्तम दर्जाचे ग्रेड-१ मधील हे चंदन मार्च १९ मध्ये लंपास झाले. या चंदनासह चोरट्यांनी तांब्याच्या धातूचे सात भलेमोठे गुंड (डेग) चोरून नेले. इंग्रजांच्या काळातील हे भारी गुंड एका व्यक्तीला उचलतही नाहीत, तर चार ते पाच लोक लागतात. हे गुंड तिखाडीचे तेल काढण्याकरिता उपयोगात आणले जायचे. या चोरीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वनाधिकारी मोकळे झाले आहेत. तथापि, अजूनपर्यंत या चोरीचा तपास लागलेला नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग