शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

व्यापाऱ्यांवर चाकूहल्ला, दगडफेकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:01 IST

शहरात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येतील घटनेचे पडसाद बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास उमटले. ३० ते ४० च्या संख्येने आलेल्या जमावाने सात ते आठ व्यापारी प्रतिष्ठानांवर प्रचंड दगडफेक केली तसेच व्यापाऱ्यावर चाकुहल्ला केला.

ठळक मुद्देबुधवार उमटले हिंसक पडसाद, ४० हल्लेखोरांचा भर बाजारात धुमाकूळव्यापारपेठ बंद : जीव मुठीत घेऊन पळाले नागरिक, एसपी झळकेंच्या उपस्थितीत कायद्याला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येतील घटनेचे पडसाद बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास उमटले. ३० ते ४० च्या संख्येने आलेल्या जमावाने सात ते आठ व्यापारी प्रतिष्ठानांवर प्रचंड दगडफेक केली तसेच व्यापाऱ्यावर चाकुहल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने शहरात खरेदीसाठी आलेले नागरिक मिळेल त्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटले होते. याप्रकरणी संतप्त व्यापाºयांनी दुकाने बंद करून पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.प्रतिष्ठानांवर दगडफेक करण्यासोबतच आलेल्या या जमावाने स्नेहा बुक डेपोचे संचालक सुशील श्रीवास्तव यांच्यावर चाकुहल्ला केला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर तात्काळ सर्व दुकाने बंद करून व्यापारी पोलीस ठाण्यावर धडकले आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. पेन्शनपुरा भागात सल्लू ऊर्फ सलमान याची मंगळवारी रात्री खून झाला. त्याचे पडसाद शहरात अशाप्रकारे उमटले. दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दगडफेक व चाकुहल्ल्यातून दहशत पसरल्याने व्यापारी वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.प्रतिष्ठानांचीही नासधूसपरिसरातील तिलक एजन्सी, होले किराणा, दारासेठ किराणा, सेल बाजार, बालाजी बॅग, स्नेहा बुक डेपो, महेंद्र कृषी केंद्र, महेंद्र आॅटो पार्ट या प्रतिष्ठानांसह एका जिलेबीच्या दुकानावरसुद्धा जाऊन दगडफेक व सामानाची नासधूस करण्यात आल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यावेळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी मिळेल त्या रस्त्याने पलायन केले.ज्वेलर्स, पेट्रोल पंप बंददगडफेकीची घटना शहरात पसरताच सर्व सोने-चांदीच्या दुकानांसह पेट्रोल पंप तात्काळ बंद करण्यात आले. शहरातील तणाव पाहता, परिसरातील सर्वच ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाºयांसह दंगा नियंत्रण पथक तसेच अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.वचक ना ठाणेदारांचा, ना एसपींचा!जिल्ह्याचे पोलीस प्रमुख जनता दरबाराच्या निमित्ताने अचलपूर शहरात होते. याच मुहूर्तावर गुंडगिरी प्रवृत्तीच्या युवकाच्या हत्येवरून अवघ्या ४० जणांच्या समूहाने परतवाडा शहराला दगडफेक करीत वेठीस धरले होते. एवढेच नव्हे तर एका व्यापाºयावर थेट चाकुहल्ला करण्यात आला. ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना अतिसंवेदनशील जुळ्या शहरांतील गुन्हेगारांची सलामीच होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. तरीही गावगुंड यथेच्छ हैदोस घालत होते. व्यापारी भयभीत होते, तर भाऊबीजेच्या खरेदीसाठी आलेले नागरिक नातलगांसह जीवाच्या आकांताने पळत होते. गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर कुणाचाच वचक दिसला नाही. ना ठाणेदारांचा, ना जिल्हा पोलीस अधीक्षकांचा!व्यापारी ठाण्यावरदहशत पसरविणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत शेकडो व्यापाºयांनी परतवाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. हा सुनियोजित कटातील आरोपींना अटक न झाल्यास जुळ्या शहरांतील व्यापारी प्रतिष्ठाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.दीड लाख लुटलेदगडफेक करणाऱ्या जमावाने स्नेहा बूक डेपोचे संचालक सुशील श्रीवास्तव यांच्यावर चाकुहल्ला केला. यावेळी दीड लाख रुपये लुटल्याची तक्रार त्यांचे बंधू कमलेश श्रीवास्तव यांनी परतवाडा पोलिसांत दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३०७, ३९५, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अतिसंवेदनशील परतवाडा-अचलपूर शहरात मंगळवारी रात्री विशिष्ट समाजाच्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त तैनात का केला नाही, असा सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे. जाळपोळ व लुटमार करण्याचा त्यांचा इरादा असल्याचाही आरोप व्यापाºयांनी केला आहे. ठाण्यात धडकलेल्या पक्ष, संघटना, व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी भाजपचे गजानन कोल्हे, सूर्यकांत जयस्वाल, किशोर कासार, अभय माथने, अरुण घोटकर, नीलेश सातपुते, जयप्रकाश धर्मा, भरत थदानी, विजय विधानी, अमर मेघवानी, उमेश अग्रवाल, पंकज मालवीय, पंकज अग्रवाल, संजय अग्रवाल, रवि बजाज, राज बारब्दे, सुरेश अटलानी, पंकज गुप्ता आदी व्यापाºयांची या निवेदनावर स्वाक्षरी होती.