शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका

By गणेश वासनिक | Updated: July 21, 2023 12:32 IST

रेल्वे सुरक्षा दलाची कार्यवाही, एप्रिल ते जून २०२३ पर्यंत विशेष मोहीम, पुणे विभागाने सर्वाधिक १३८ मुलांची सुटका केली

अमरावती : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची सुटका करुन त्यांना  वाचवण्याची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सरकारच्या समन्वयाने ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी म्हणजेच ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत यामध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानाना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

मध्य रेल्वेवर एप्रिल ते जून २०२३ मध्ये सुटलेल्या मुलांचे विभागनिहाय तपशील

 - मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे. - भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली. - पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व १३८ मुलांचा समावेश आहे - नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली असून त्यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश आहे. - सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून यामध्ये ७ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे