शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

By गणेश वासनिक | Updated: December 6, 2022 17:04 IST

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार

अमरावती : शहरी भागालगतच्या वनक्षेत्रावरील अतिक्रमण आणि धार्मिक स्थळांची निर्मिती ही गंभीर समस्या उद्‌भवल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने अशा वनक्षेत्रांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. शहरालगतच्या वनक्षेत्राची सीमा निश्चित करून ते क्षेत्र संरक्षण कुंपणाने बंदिस्त केले जाणार आहे. त्याकरिता केंद्र सरकारचे वने व पर्यावरण मंत्रालय स्वतंत्र निधी देणार आहे. 

शहरालतच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण करणारी टोळी सक्रिय झाली आहे. वनजमिनीवर अतिक्रमण करायचे, ते परस्पर विकायचे हा व्यवसाय काही ठिकाणी सुरू आहे. एवढेच नव्हे तर शहरालगतच्या वनक्षेत्राच्या क्रिम जागा गिळंकृत करण्यासाठी बिल्डर्स लॉबीदेखील कार्यरत आहे. प्रशासनाला हाताशी धरून वनजमिनी मिळविण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे शहरालगत वनक्षेत्र रेकॉर्डवर वेगळेच दर्शविले जाते.

प्रत्यक्षात या वनक्षेत्रावर अतिकमण, धार्मिक स्थळांचा कब्जा आहे. मात्र, वने व पर्यावरण मंत्रालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून शहरालगतच्या वनक्षेत्राचे संरक्षणासाठी उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहे. शहरालगतची वनजमिन नेमकी किती? याचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर उपलब्ध वनक्षेत्राच्या संख्येनुसार या वनजमिनीवर जीपीएस प्रणालीच्या आधारे तारेचे कुंपण, संरक्षण भिंत अथवा सिमेंटचे पोल उभारून वनक्षेत्राची निश्चिती केली जाणार आहे.

या शहरात वनक्षेत्रावर अतिकमणाची समस्या

नंदूरबार, ठाणे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, नाशिक,जळगाव, धुळे, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या शहरालगतच्या वनक्षेत्रावर निवासी अतिक्रमण, धार्मिक स्थळे निर्माणाधिन आहेत.वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

राज्यात कोणतेही शहर असो. वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणास वनाधिकारी जबाबदार आहेत. शहरालगतच्या वनक्षेत्रावर अतिकमण वा धार्मिक स्थळांची निर्मिती होत असताना ते तात्काळ हटविले जात नाही. त्यामुळे अतिक्रमण धारकांना ते फावत असून, त्यांचे मनसुबे बळावते. त्यामुळेच अमरावती शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण, धार्मिक स्थळे आजही कायम आहे. वरिष्ठ वनाधिकारी तीन वर्षांसाठी कर्तव्य बजावण्यासाठी येतात. परंतु, कुणीही वनक्षेत्रावरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवित नाही, हे वास्तव आहे.‘त्या’ वनक्षेत्रांवर रोपवन, गार्डन

राज्यात आतापर्यंत शहरालगतच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण झाल्यामुळे सुमारे पाच हजार हेक्टर वनजमिन गिळंकृत झाली आहे. मात्र, शहरालगतच्या वनक्षेत्राची सीमा निश्चित करून त्यावर रोपवन, गार्डन किंवा कर्मचारी वसाहती साकारण्याचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावतीCentral Governmentकेंद्र सरकारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार