मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. खबरदारी म्हणून नवदाम्पत्याने मास्क वापरला. दरम्यान शहरातील मंगल कार्यालयांना नोटीस बजावल्यानंतर आठ विवाह रद्द करण्यात आले, तर गुरुवारी तालुक्यात दोन विवाह घरगुती पद्धतीने लावण्यात आले.धामणगाव रेल्वे हे शहर नागपूर, मुंबई, पुणे, यवतमाळ या चारही शहरांशी संलग्नित आहे. दररोज रेल्वेने अनेक प्रवासी मुंबई, पुणे येथून यवतमाळला जाण्या-येण्याकरिता धामणगाव रेल्वेस्थानकावर येतात. शहरात चार दिवसांत मुंबई, पुणे येथून तब्बल ३५ विद्यार्थी आपआपल्या घरी परतले आहे. जमाव बंदी कायदा अंतर्गत तालुका प्रशासनाने शहरातील असलेले सर्व मंगल कार्यालयाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे काही वधू-वर मंडळींनी ३१ मार्चपूर्वीची तारीख रद्द करून एप्रिल-मे महिन्यात नवी तारीख घेतली आहे. गुरुवारी तालुक्यातील निंभोरा बोडखा या गावात दोन विवाह घरगुती पद्धतीने करण्यात आले.
निंभोरा बोडक्यात मास्क लावून विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST
धामणगाव रेल्वे हे शहर नागपूर, मुंबई, पुणे, यवतमाळ या चारही शहरांशी संलग्नित आहे. दररोज रेल्वेने अनेक प्रवासी मुंबई, पुणे येथून यवतमाळला जाण्या-येण्याकरिता धामणगाव रेल्वेस्थानकावर येतात. शहरात चार दिवसांत मुंबई, पुणे येथून तब्बल ३५ विद्यार्थी आपआपल्या घरी परतले आहे. जमाव बंदी कायदा अंतर्गत तालुका प्रशासनाने शहरातील असलेले सर्व मंगल कार्यालयाला नोटीस बजावली आहे.
निंभोरा बोडक्यात मास्क लावून विवाह सोहळा
ठळक मुद्देपाहुणे मोजकेच : नवदाम्पत्याने दाखविली सजगता