शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सावधान, लिंबू सरबतही घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:45 IST

मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.

ठळक मुद्देअखाद्य बर्फाचा वापर : उन्हाळ्यात होतो मोह

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवाला हवेहवेसे वाटणारे लिंबू सरबत जेवढे आरोग्याला पोषक आहे, तेवढेच ते घातकही ठरू लागले आहे. यामध्ये अखाद्य बर्फाचा वापर होत असल्याने ते आरोग्याला घातक ठरू शकते.एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४३ अंशापर्यंत पोहचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालूस उत्पन्न होते. लिंबू सरबत, कोल्ड्रींक्स आणि इतर शीतपेयांच्या गाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोेन ग्लास शितपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे लिंबू सरबत नागरिकांना खास आकर्षित करते. परंतु हे सरबत पित असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे.सरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केला असल्याने हे सरबत पिल्याने यामुळे टायफाईड व अतिसार सारखे आजार होवू शकतात. लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केलेला असेल तर अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शितपेय, लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. कोल्ड्रींकपासून शरीरावर होणाऱ्या विपरित परिणांमावर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी त्यांचा मोर्चा लिंबू सरबताच्या गाड्यांकडे वळविला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळविण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात. यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते. याही पेक्षा घातक प्रकार म्हणजे काही ठिकाणी तर येथील शवच्छिेदन केंद्रात वापरल्या जाणाºया बर्फाच्या लादीचा देखील सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची चर्चा आहे.अखाद्य बर्फाचे दूषित पाणी पोटात गेल्याने कावीळ, लिव्हरचे आजार, डायरिया, पोटाचे विकार असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे राहते.- डॉ. राजेश मुंदे,एमडी.