खल्लार पोलिसांची कारवाई : ५७ जनावरांचे वाचले प्राणलोकमत न्यूज नेटवर्कखल्लार : अवैधरीत्या कत्तल करण्यासाठी गोवंश घेऊन जाणारा ट्रक खल्लार पोलिसांनी पकडला. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपींनी घटनास्थळाहून पलायन केले आहे. ही घटना सोमवारी रात्रीे ९.३० वाजता दरम्यान खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.अ. समद बाबू (५५) शहजानपूर मध्यप्रदेश, शे.कलीम सलीम (२३) राजगड मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या अरोपींचे नाव आहे. रहेमान (५०) गणी (३०, रा.शालीया) असे पसार झालेल्या आरोपींचे नावे आहे. एमपी ०९ एमएच ४६५२ या ट्रकमध्ये जनावरे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना या मार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाला थांबवून झडती घेतली असता ५७ गोवंश त्या ट्रकमध्ये कोंबून नेत असल्याचे आढळून आले. जनावरे कत्तलीसाठी नेणारा ट्रक हा आसेगावहून आला होता. तो खल्लारमार्गे मध्यप्रदेशातातून आला होता. अकोला येथे जात असल्याचाही माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. या ट्रकमधून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व गोवंशाना नजीकच असलेल्या रासेगाव येथील गौरक्षणमध्ये पाठविण्यात आले आहे. ही कारवाई एपीआय शिवांगी आगाशे, पीएसआय आशिष ठाकूर व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला
By admin | Updated: June 7, 2017 00:08 IST