शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

आनंदोत्सव

By admin | Updated: November 1, 2014 01:28 IST

राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ...

अमरावती : राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पद व गोपनीयतेची शपथ घेताच शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चौका-चौकांत फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप करण्यात आले. येथील नवाथे चौकात भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून जल्लोष व्यक्त केला. वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत असतानाच अमरावतीतील त्यांच्या समर्थकांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. येथील राजकमल चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदीपक आतषबाजी केली. यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राजापेठ कार्यालयात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी बेधुंद नृत्य केले. महिला कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेर धरला. यावेळी ‘देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देण्यात आल्या. भाजपचे अनेक कार्यकर्ते, शपथविधी सोहळ्याकरिता मुंबईला गेल्याने मोजकेच कार्यकर्ते हजर होते. मात्र, त्यांच्या उत्साहात कोणतीच कमतरता आढळली नाही. दीड लाख फटाक्यांची आतषबाजीअमरावती : भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष राधा कुरील, माजी नगरसेवक विनय नगरकर, दिलीप पोपट, नरेंद्र संगेले, सदाभाऊ पुंशी, रवींद्र खांडेकर, विवेक कलोती आदींच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयापुढे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्यानंतर रस्त्यावरील कचरा साफ करण्याचेही सौजन्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखविले, हे विशेष. यावेळी गंगा खारकर, लता देशमुख, प्रभा रौदांळकर, लवीना हर्षे, नंदा सूर्यवंशी, अलका सप्रे, सुधा तिवारी, माया टेकाडे, सिमेश श्रॉफ, संजय पाटील, विशाल जोशी, नितीन सेवक, रमेश शर्मा, मधु उमेकर, राजू कुरिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.येथील अंबागेट ते आझाद हिंद मंडळ चौकापर्यत दिड लाख फटाक्यांची आतषबाजी करुन हा परिसर संपूर्ण भाजपमय करण्यात आला होता. सुमारे अर्धा तास भर चाललेल्या या आतषबाजीने परिसर दणाणून गेला. माजी नगरसेवक संजय तिरथकर, कर्नल सिंग राहल, विवेक कलोती, अजय सामदेकर, महेश महल्ले, सुनील खराटे, अमीत सोईतकर, धर्मेश आलेकर, रवींद्र चावंडे, विजय उपाध्याय आदींच्या नेतृत्वात फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. येथील शाम चौक, जवाहर गेट, सक्करसाथ, चित्रा चौक, कॉटन मार्केट परिसरातही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दस्तूरनगर चौक, कंवर नगर, मोतीनगर, रुख्मिणीनगरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंचवटी चौकातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. मुख्यमंत्रपदाची देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० जणांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याचा सोहळा अनेकांनी दूरचित्रवाहिनीवरुन बघितला. शपथविधी सोहळा सुरु असताना व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळाला. तर काही व्यावसायिकांनी एलबीटी बंद होईल, अशी आशा देखील व्यक्त केली.