वीरगव्हाणजवळील घटना : ओव्हरटेक करताना घडला अपघातअमरावती : ओव्हरटेक करताना भरधाव मालवाहू मिनीट्रक उलटून २७ मजूर जखमी झालेत. ही घटना कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील वीरगव्हाण गावाजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्डी येथील रहिवासी २७ मजूर हे शेतीच्या कामानिमीत्त मालवाहू ट्रक एमएच २७एक्स ३१६१ ने कुऱ्हा जात होते. मात्र, दरम्यान विरगव्हाण गावाजवळ मालवाहू ट्रक एका वाहनाला ओव्हरटेक करित समोर जाण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात २७ मजूर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच कुऱ्ह्याचे पोलीस अधिकारी गरूड व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लक्ष्मी राठोड (३०), नर्मदा पाडुरंग राठोड (१४), सुमित्रा राठोड (६५), अनयोगसिंग पवार (२२), बावी आडे (२५), दिनेश बसराम आडे (३०), उमेश ग्ेोणलाल राठोड (१९), मनु तुकाराम आडे (२७), लाला पवार (६०), दुर्गा अशोक राठोड (४६), सुनंदा परसराम राठोड (३७), निर्मला सुखदेव आडे (३४), बसंती पुरुषोत्तम राठोड (३६), देवीदास धनसिंग चव्हाण (४०), योभारत रामचरण भोसले (६०), शालु सुधाकर राठोड (३०), रवि सुधाकर राठोड (३०), कमला दसकाम आडे (४०), सुभी गुलाब राठोड (४०) याचा समावेश आहे. (प्रतिनिधी)उपचाराकरिता डॉक्टर, परिचारिकांची धावपळइर्विन रुग्णालयात रुग्णांचा ओढ सुरु असते, अशाप्रसंगी अपघातातील २७ जखमी अचानक दाखल झाले. त्यामुळे तत्काळ आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली. जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक तितरे यांच्या मार्गदर्शनात अधिसेविका मंदा गाढवे यांच्यासह काही परिचारिकांनी तत्काळ रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. त्यामुळे जखमी मजूरांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याचा दिलासा मिळाला.
मालवाहू मिनीट्रक उलटून २७ जखमी
By admin | Updated: August 6, 2016 00:12 IST