शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:28 IST

Amravati : तीन प्रमुख उमेदवार वगळता ३४ उमेदवारांना मिळाली फक्त ४.५ टक्के मते

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती: मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अमरावतीमधून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा १९,७३१ मतांनी पराभव केला. अमरावतीमध्ये सर्वाधिक ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील प्रमुख तीन उमेदवार वगळता उर्वरित ३४ उमेदवारांना ५२,९२४ मते मिळाली असून, एकूण वैध मतांपैकी केवळ ४.५ टक्केच मते मिळाली आहेत. त्यामुळे अमरावतीकरांनी अपक्षांसह छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांना नाकारल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. येथे तब्बल २८ वर्षांनी बळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसचा खासदार निवडून आला. वानखडे हे काँग्रेसचे पहिले एससी खासदार आहेत. अमरावती लोकसभेच्या मैदानामध्ये तब्बल ३७ उमेदवार उतरले होते. यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार ज्यामध्ये भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखडे, तर बसपाकडून संजयकुमार गाडगे मैदानात होते, तर १० छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रहाराचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. त्याचबरोबर २४ अपक्ष उमेदवारांनीदेखील अमरावतीच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे हे अपक्ष आणि छोट्या घटक पक्षाचे उमेदवार कोणाचे गणित बिघडवतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते; परंतु निकालामध्ये बसपा या राष्ट्रीय पक्षासह इतर सर्वच अपक्ष व छोट्या घटक पक्षांच्या उमेदवारांना अमरावतीच्या मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य लढत नवनीत राणा व बळवंत वानखडे यांच्यात झाली. यामध्ये बळवंत वानखडे यांना ५,२६,२७१ मते, तर नवनीत राणा यांना ५,०६,५४० मते मिळाली. त्यांच्या खालोखाल प्रहारचे दिनेश बूब यांना सर्वाधिक ८५,३०० मते मिळाली. उर्वरित सर्वच ३४ उमेदवारांना मिळून ५२,९२४ इतकीच मते मिळाली असून, एकूण वैध मतदानापैकी ४.५ टक्के इतकेच ही मते आहेत. या सर्वच उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली आहे. ३० असे उमेदवार आहेत, ज्यांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती