शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कर्करोगाचा चढता आलेख

By admin | Updated: March 11, 2015 00:24 IST

तंबाखूच्या सेवनातून कर्करोग होत असून जिल्ह्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे शासकिय आकडेवारीवरून लक्षात येत आहे.

लोकमत दिन विशेषवैभव बाबरेकर अमरावतीतंबाखूच्या सेवनातून कर्करोग होत असून जिल्ह्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे शासकिय आकडेवारीवरून लक्षात येत आहे. जिल्ह्यात ९०३ नागरिकांना कर्करोग झाल्याची पुष्टी शासकिय आकडेवावरून होत आहे. त्यातच खाजगी रुग्णालयातही कर्करुग्ण अधिक आढळून येत आहे. दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जागतीक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेत लक्षात आले आहे. आज नो स्मोकिंग डे दिनानिमीत्त जिल्ह्यातील आढावा. भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी ८ ते ९ लाख नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. पुढील २० वर्षांत ही संख्या अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या धुरामध्ये ४ हजार हानीकारक आणि विषारी रसायन आहे. त्यात निकोटिन, टार व कार्बन मोनॉक्साईड सारख्या घातक रसायनांचा समावेश आहे. अमरावती जिल्हात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय अससर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१२ ते १३ दरम्यान २९ नागरिकांना कर्करोग असल्याची पुष्टी झाली असून २०१३-१०१४ मध्य ७९३ वर पोहचली आहे. तसेच डिसेंबर २०१४ पर्यंत पुन्हा ८१ कर्करोगी आढळून आले आहेत. आतापर्यंत ९०३ कर्करोगीची तपासणी करण्यात आली असून ७७८ रुग्णांचा उपचार करण्यात आला आहे. हा एक समाजासाठी चिंतेचा विषय आहे.